संतप्त शेतकऱ्यांचा चासकमानच्या पाण्यावर ताबा

Updated On:

केंदुर (वार्ताहर) : करंदी (ता. शिरूर) येथील चासकमानच्या धानोरे – कोरेगाव चारीला पाणी सोडण्यासाठी जातेगाव, करंदी, पिंपळे जगतापच्या शेतकाऱ्यांनी चक्री उपोषण केले होते मात्र चासकमानच्या तीन अधिकाऱ्यांनी आज (रविवारी) पाणी सोडण्याचे खोटे आश्वासन देऊन उपोषण मागे घ्यायला लावले त्यानंतर शनिवारी आश्वासनाची पूर्तता होणार नाही असं सांगून शेतकऱ्यांना फसवल्यामुळे शेतकरी संतप्त झाले. आणि अखेर या भागातील शेतकऱ्यांनी चासकमानच्या पाण्यावर ताबा घेऊन धानोरे – कोरेगाव शाखेचा दरवाजा उघडा करून पाणी सुरू केले आहे.

आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी या अगोदर पोलिस प्रशासनाला याबाबत अगोदरच कळविले होते मात्र त्या ठिकाणी चासकमानचे अधिकारी फिरकले नाही त्यामुळे शेतकरी देखील चासकमानच्या कालव्यावर ठाण मांडून बसले आहेत.

आमच्या हक्काचं पाणी असून देखील आम्हाला पाणी मिळत नसल्याने या भागातील शेतकऱ्यांवर नेहमीच अन्याय होत आहे. त्यामुळे यापुढे असा अन्याय आम्ही शेतकरी सहन करणार नाही. आमच्या हक्काचं पाणी आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही. आम्ही अगोदर लोकशाही मार्गाने पाणी मागणी करून उपोषण सुरू केले मात्र ते मोडीत काढुन आमच्यावर अन्याय केला म्हणून आम्हाला आमच्या हक्काचं पाणी स्वतः घ्यावं लागले आहे, अशा भावना यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.
यावेळी जातेगाव खुर्द, पिंपळे जगताप, कारंदी, सणसवाडी, कोरेगाव येथील अनेक शेतकरी उपस्थित होते.

आणखी संबंधित बातम्या

Pune District : विड्याच्या पानांची २,१०० डागांची विक्रमी आवक

2026-10-08 07:37:51

Pune District : विड्याच्या पानांची २,१०० डागांची विक्रमी आवक

Indapur : दुष्काळावर उपाययोजण्यासाठी शरद पवार मुख्यमंत्र्यांना भेटणार

2026-10-08 07:28:41

Indapur :  दुष्काळावर उपाययोजण्यासाठी शरद पवार मुख्यमंत्र्यांना भेटणार

Pune District : शेततळ्यात बुडून दहा वर्षीय मुलीचा मृत्यू

2026-10-07 10:29:35

Pune District : शेततळ्यात बुडून दहा वर्षीय मुलीचा मृत्यू

Pune District : सोमेश्‍वरच्या शिवारात जगतापांपुढे आव्हान

2026-10-07 08:32:01

Pune District : सोमेश्‍वरच्या शिवारात जगतापांपुढे आव्हान

Chakan : चाकणच्या वाहतूक कोंडीला नियोजनाचा अभाव

2026-10-07 08:25:57

Chakan : चाकणच्या वाहतूक कोंडीला नियोजनाचा अभाव