पुणेः सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडिओ व्हायरल होईल याचा काही नेम नाही. सोशल मीडियावर पुणेकरांचेही बरेच गंमीतशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. एखादा व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेन्ड झाला की सर्वत्र त्या व्हिडिओचीच चर्चा केली जाते. सध्या असाच एक गंमतीशीर व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे. व्हायरल होणारा व्हिडिओ पुणे मेट्रोतला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला हसू कंन्ट्रोल होणार आहे.
शहरातील प्रवास सुलभ व्हावा आणि पुणेकरांना वाहतूक कोंडीतून सुटेकाचा निश्वास घेता यावा. यासाठी पुणे मेट्रो सुरू करण्यात आली. सुरुवातीचे काही दिवस पुणे मेट्रोला इतकास प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, आता पुणे मेट्रोतून प्रवाशांची संख्या वाढताना दिसत आहे. कित्येक जण पुणे मेट्रोचा प्रवास करत आहेत. रोज काही काही गंमतीशीर किस्से मेट्रोत होतच असतात. आता जो व्हिडिओ इन्स्टाग्रावर व्हायरल होत आहे. त्यात मेट्रो दिसत आहे. ज्यामध्ये काही तरुण दरवाजाजवळ उभे आहेत.
ज्यावेळी मेट्रो स्टेशनवर येते. त्यावेळेस होणाऱ्या अनाउन्समेंटची गंमतीशीर नक्कल हे तरुण करताना दिसत आहेत. या तरुणांची गंमतीशीर नक्कल पाहून मेट्रोतील तिथे असणारे अनेकजण हसताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सध्या इन्स्टाग्रावर प्रचंड व्हायरल होत आहे. puneri kataa या पेजवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. त्या व्हिडिओच्या खाली कॅप्शनमध्ये पोरांनी तर नादच केला असे लिहिण्यात आले आहे. या व्हिडिओवर अनेक कमेंट्स देखील येत आहेत. या कमेंट्स देखील हसायला लावणाऱ्या आहेत.
या पेजवरून व्हिडिओ व्हायरल झालेल्या पेजची लिंक
https://www.instagram.com/punerikataa/?utm_source=ig_embed&ig_rid=71348657-d12d-4c3b-ac77-e727e013be90