Rinku Rajguru : ..अन् वडिलांनी घराबाहेर काढलं; रिंकूने सांगितली ‘ती’ आठवण, असं काय घडलं होतं?

Actress Rinku Rajguru : ‘सैराट’ चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर रिंकू राजगुरू महाराष्ट्राच्या घराघरात पोहचली. या चित्रपटानंतर तिने आपला मोर्चा हिंदी चित्रपट सृष्टीकडे वळवला. तिने मराठीसह हिंदी चित्रपट आणि वेबमालिकेत कामं केलं. यामुळे अभिनेत्री रिंकू राजगुरूला मोठी लोकप्रियता मिळाली आहे.
तिचा साधेपणा, तिची परखड भाष्य करण्याची पद्धत आणि तितक्याच संयमीपणे मांडलेले मुद्दे संगळ्यांनाच आवडतात. नुकतीच रिंकूने एका मुलाखलतीमध्ये तिच्या बालपणीचे काही किस्से शेअर केले आहेत. लहापणी ती खुपच मस्तीखोर असल्याने तिला तिच्या वडिलांनी घराबाहेर काढलं होतं. हा त्यापैकी एक किस्सा तिने शेअर केला.
रिंकूने व्हायफळ गप्पा या चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत लहानपणी मी खूप हट्टी आणि मस्तीखोर होते. माझे आई-वडील दोघेही शिक्षक आहेत. त्यामुळे लहानपणापासून माझा जास्त वेळ शाळेत गेला.
चौथी पाचवीत असताना तिच्याकडे सायकल होती. तिने तिच्या वडिलांनाकडून सायकल चालवायला जायची परवानगी घेतली. त्यानंतर ती सायकल चालवत तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली. तिथे एक झाड होतं. त्या झाडाजळ सगळे खेळत होते. खेळता खेळता संध्याकाळचे सात वाजून गेले हे कळलं नाही.
View this post on Instagram
वेळ पाळण्यावरून मला….
“मला बाबांच्या गाडीचा आवाज ऐकू आला. मी खूप घाबरले. मी बाहेर आले तेव्हा बाबा एका हाताने गाडी चालवत होते आणि एका हातात काठी होती. मी बाबांना सॉरी म्हंटलं. बाबा मला ओरडले आणि आम्ही मग घरी जायला निघालो. घरी पोहचल्यानंतर बाबांनी गेट लावून घेतलं. वेळ न पाळण्यावरून ते मला खूप ओरडले आणि घराबाहेर राहायचं असे सांगितलं.
मी बाहेर रडत उभी होते. तेव्हा शेजारच्या काकूंनी मला आत घेतलं. त्यांनी मला जेवायला दिलं. थोड्यावेळाने बाबा तिथे आले आणि ते मला घेऊन गेले.” अशी लहाणपणीची आठवण रिंकून सांगितली. रिंकू आता मराठीतच नाही, तर हिंदी इंडस्ट्रीमध्येही काम करत आहे. तिचे आगामी काळात अनेक मराठी आणि हिंदी प्रोजेक्ट येणार आहेत.
हेही वाचा: रणबीर धूम 4 मध्ये खलनायक? चित्रपटाची मोठी अपडेट समोर; या अभिनेत्रींच्या नावांची चर्चा





