रणबीर धूम 4 मध्ये खलनायक? चित्रपटाची मोठी अपडेट समोर; या अभिनेत्रींच्या नावांची चर्चा

Dhoom 4 Actor Ranbir Kapoor : धूम चित्रपटाच्या चौथ्या भागाबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. या चित्रपटाची रिलीज डेट संबंधित आणि अभिनेता रणबीर कपूर विषयी बातमी समोर आली आहे. २००४ मध्ये प्रदर्शित झालेला अभिषेक बच्चन आणि जॉन अब्राहमची मुख्य भूमिका असलेला ‘धूम’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला.
यानंतर २००६ मध्ये अभिनेता हृतिक रोशन आणि अभिषेक बच्चन ही जोडी ‘धूम २’ मध्ये पाहायला मिळाली होती. या चित्रपटाच्या तिसऱ्या भागात आमिर खान आणि अभिषेक बच्चन यांनी एकमेकांसोबत स्क्रीन शेअर केली. यानंतर आता धूम ४ ची चर्चा केली जात असून, रणबीर खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे बोलले जात आहे.
ताज्या वृत्तांनुसार, निर्माता आदित्य चोप्रा लेखक श्रीधर राघवन यांच्यासोबत धूम ४ ची पटकथा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे. रणबीर कपूर या चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारू शकतो अशा बातम्या समोर येत आहेत. त्या अनुषंगाने धूम ४ ची पटकथा लिहिली जात आहे. तसेच रणबीर कपूरसोबत या चित्रपटात अनेक अभिनेत्रींच्या नावांची देखील चर्चेत केली जात आहे. पिंक व्हिलाच्या मते, रणबीर ‘धूम ४’ मध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
View this post on Instagram
धूम ४ चित्रपटाची रचना जागतिक पातळीवरील अॅक्शन लक्षात घेऊन केली जात आहे. तसेच चित्रपटाची कथा, दृश्य आधीच सेट केलेल्या YRF स्पाय युनिव्हर्सपेक्षा खूपच वेगळी असणार आहेत. वॉर २ च्या रिलीजनंतर धूम ४ च्या प्री-प्रॉडक्शनच्या कामाला सुरूवात केली जाणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आयन मुखर्जी करणार आहेत. हा चित्रपट २०२७ मध्ये रिलीज होऊ शकतो असे सांगितले जात आहे.
या अभिनेत्रींची नावे आहेत चर्चेत
कीर्ती सेनन, नयनतारा, कियारा अडवाणी, रश्मिका मंदाना, दीपिका पादुकोण, समंथा रुथ प्रभू, श्रद्धा कपूर
हेही वाचा: अभिनेत्री शर्वरी बनली ‘यंग फिट इंडिया आयकॉन’; आनंद व्यक्त करत म्हणाली “ही माझ्यासाठी गर्वाची…”





