Ananya Pandey : भरझरी मोत्यांचा ड्रेस! अनन्या पांडेच फोटोशूट चर्चेत; लूकने वेधलं लक्ष, VIDEIO पाहा…

Ananya Pandey : बॅालिवूड अभिनेत्री अनन्या पांडेने तिच्या सोशल मीडिया हँडलवर स्वतःचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिच्या स्टाइलिश लूकमुळे अन्यन्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अनन्या तिच्या आगामी ‘तू मेरी मैं तेरा मैं तेरा’ या सिनेमानामुळे देखील चर्चेत आहे.
तिच्या स्टाइलिश लूकवर तिचे वडील चंकी पांडे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. अनन्या पांडेने तिच्या स्टाइलिश लूकमधील एक खास व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती मेकअप करताना दिसत आहे. त्यानंतर तिने मोत्यांनी जडलेल्या ड्रेस वेअर केल्याचं दिसत आहे.
या ड्रेसमुळे तिचं सौंदर्य आणखी खुलून दिसत आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिने, ‘माझे वडील (चंकी पांडे) असे म्हणत नाहीत की माझा ग्लॅमर कॉमेडी शोसारखा दिसतो. हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, असं म्हटलं आहे. तिच्या या व्हिडीओवरून तिच्या चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत.
एका चाहत्याने लिहिले, ‘मला ते खूप आवडले’ दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले, ‘अनन्याने एक नवीन हेअरस्टाईल केली आहे, तुम्हाला ही हेअरस्टाईल आवडते का?’
View this post on Instagram
अभिनेता कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडे हे तू मेरी मैं तेरा या सिनेमात दिसणार आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन समीर विद्वान यांनी केलं आहे. या सिनेमाची निर्मिती करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन्स आणि नमः पिक्चर्स यांनी केली आहे. हा सिनेमा पुढीच्या व्हॅलेंटाईन डे म्हणजेच १३ फेब्रुवारी २०२६ या दिवशी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा : SIP Top 5 Mistakes: SIP मध्ये गुंतवणूक करताय? ‘या’ 5 चुका टाळा, अन्यथा परताव्याऐवजी होईल मोठे नुकसान





