अनन्या पांडेने ट्रोलिंगवर केले भाष्य; म्हणाली “माझ्या कुटुंबालाही त्रास…”

Ananya Pandey | अभिनेत्री अनन्या पांडेने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिच्या करिअरच्या सुरुवातीपासूनच अनन्या ट्रोलिंगचा सामना करत आहे. अनन्या पांडेने आता तिच्या ट्रोलिंगबद्दल उघडपणे भाष्य केले आहे आणि ट्रोलिंगचा तिच्यावर काय परिणाम होतो हे सांगितले आहे. याशिवाय कुटुंबीयांवरही या नकारात्मकतेचा प्रभाव कसा पडला? यावरही तिने भाष्य केले आहे.
एका मुलाखतीदरम्यान अनन्या पांडेला ट्रोलिंगबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तिने सांगितले की, “मी बऱ्याच दिवसांपासून ट्रोलिंगचा सामना करत आहे. मला करिअरच्या सुरुवातीपासूनच ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे, एवढेच नाही तर शाळेच्या काळातही मला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. शाळेच्या दिवसात मला ‘कोंबडीचे लेग पीस’, ‘फ्लॅट स्क्रीन’ म्हणून हिणवले जायचे. याचा खूप त्रास व्हायचा, पण आता काळ बदलला आहे, छोटी गोष्ट ही सोशल मीडियावर मोठी समस्या बनते आहे आणि हे भीतीदायक आहे.” Ananya Pandey |
पुढे अनन्या म्हणाली की, “अभिनेत्री असल्याने सोशल मीडियावर सक्रिय राहणे महत्त्वाचे असते, मात्र या माध्यमांवरील नकारात्मक टीकेचा मला आणि माझ्या कुटुंबालाही त्रास झाला आहे. माझी धाकटी बहीण रईसाही याची बळी ठरली. रईसाचे अभिनेत्री होण्याचे स्वप्न नसताना, तिच्या फोटोवर नको त्या प्रतिक्रिया येऊ लागल्या होत्या.” ट्रोलिंगची शिकार झाल्यानंतर अनेकवेळा थेरपीची गरज पडल्याचेही यावेळी तिने सांगितले. Ananya Pandey |
अनन्याच्या कामाबद्दल सांगायचे तर, ती शेवटची ‘कॉल मी बे’ नावाच्या वेब सीरिजमध्ये दिसली होती आणि आता त्या वेब सीरिजचा पुढचा सीझन येणार आहे. याशिवाय ती अक्षय कुमार आणि आर माधवन यांच्या चित्रपटातही दिसणार आहे.





