अनन्या परदेशी मॉडेलच्या पडली प्रेमात पडली

अनन्या पांडे अनेकदा तिच्या रिलेशनशिप आणि लिंक-अपच्या बातम्यांमुळे चर्चेत असते. ‘कॉफी विथ करण’च्या शेवटच्या सीझनमध्ये अभिनेत्रीने बॉलिवूड अभिनेता आदित्य रॉय कपूरसोबतच्या तिच्या नात्याबाबत बोलली होती. पण बऱ्याच दिवसांपासून बॉलीवूडच्या कॉरिडॉरमध्ये अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांचे ब्रेकअप झाल्याच्या बातम्या येत होत्या, त्यानंतर चाहत्यांना अभिनेत्रीच्या नवीन बॉयफ्रेंडचीही सोशलवर चर्चा आहे.
View this post on Instagram
आज अनन्या पांडेच्या बॉयफ्रेंडने तिच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट शेअर करून तिचे नाते इंस्टावर अधिकृत केले आहे. अनन्याचा बॉयफ्रेंड वोल्कर ब्लँकोने अभिनेत्रीच्या वाढदिवसानिमित्त एक पोस्ट शेअर केली आणि लिहिले, ‘हॅपी बर्थडे ब्यूटीफुल. तू खूप खास आहेस. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो ऍनी…’.
अभिनेत्रीच्या प्रियकराने त्यांच्या नात्याची पुष्टी केली. बॉयफ्रेंड वोल्कर ब्लँकोने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये अनन्या पांडे निळ्या रंगाच्या टॉपमध्ये दिसत आहे. फोटोमध्ये अभिनेत्री अतिशय साध्या लूकमध्ये दिसत आहे. या पोस्टवर अभिनेत्रीचे चाहते खूप आनंदी दिसत आहेत. वोल्कर ब्लँको कोण आहे? अशीही चर्चाही सोशलवर रंगली आहे.अनन्या पांडेचा बॉयफ्रेंड वोल्कर ब्लँको हा अमेरिकेचा रहिवासी आहे. तो आपला बहुतेक वेळ मियामी, फ्लोरिडामध्ये घालवतो.





