‘लायगर’ कपल अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडा हरवले एकमेकांत; व्हिडिओ व्हायरल

मुंबई – साऊथचा स्टार विजय देवरकोंडा बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. बॉलिवूडच्या ‘लायगर’या चित्रपटात अभिनेता दिसणार आहे. या चित्रपटात विजयसोबत अनन्या पांडे मुख्य भूमिकेत असणार आहे. अनन्या आणि विजयने या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. आता चाहते त्याच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान विजय आणि अनन्याची नुकतीच एका पार्टीत भेट झाली होती, ज्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये विजय आणि अनन्या एकमेकांशी बोलण्यात दंग झाले आहेत.
View this post on Instagram
अपूर्व मेहताच्या वाढदिवसाच्या पार्टीनिमित्त अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. ज्यामध्ये कतरिना कैफ-विकी कौशल, करण जोहर, अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडा यांनी हजेरी लावली होती. विजय आणि अनन्या दोघेही ब्लॅक कलरच्या आउटफिटमध्ये दिसले. दोघांचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये दोघे हसत हसत बोलत आहेत.
विजय आणि अनन्याचा हा व्हिडिओ चार्मी कौरने शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना चार्मीने लिहिले- माझे जबरदस्त लायगर कपल. विजय आणि अनन्याला एकत्र पाहून चाहते खूप खुश झाले आहेत. चार्मीच्या या पोस्टवर दोघांचेही चाहते खूप कमेंट करत आहे.





