Ananya Panday : बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडे आपल्या चित्रपटांशिवाय वैयक्तिक आयुष्यामुळेही नेहमीच चर्चेत असते. विशेषतः अनन्याच्या रिलेशनशिपबद्दल अनेक चर्चा होत असतात. यातच आता अनन्याने व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तिच्या प्रेमाची कबूली दिल्याचे म्हंटले जात आहे. अनन्या पांडे एका विदेशी मॉडेलला डेट करत असल्याची चर्चा आहे. तिने सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर केल्याने या चर्चांना उधाण आले आहे. व्हॅलेंटाईन डे निमित्त खास पोस्ट Ananya Panday Post तिने इन्स्टाग्राम अकाउंटवरून व्हॅलेंटाईन डे निमित्त एक स्टोरी शेअर केली. त्यात तिने मॉडेल वॉकर ब्लॅन्कोचा फोटो शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. वॉकरच्या बर्थडे निमित्तानं तिनं ही पोस्ट लिहिली आहे. या फोटोमध्ये वॉकर घराच्या बाल्कनीत बसलेले आणि फोनवर बोलताना कॅमेऱ्याकडे पाहून पोझ देताना दिसत आहेत. फोटोसोबत अनन्याने कॅप्शनमध्ये लिहिले, “हॅप्पी बर्थडे वॉकर ब्लॅन्को, तू सर्वात बेस्ट आहेस.” अनन्याच्या या पोस्टमुळे तिने आपले रिलेशनशिप अधिकृतपणे जाहीर केल्याची चर्चा रंगू लागली आहे. यापूर्वी अनन्याच्या अनन्याच्या बर्थडेला वॉकरने तिच्यासाठी पोस्ट लिहिली होती. त्याने लिहिलेलं, “हॅप्पी बर्थडे ब्युटिफुल. आय लव्ह यू अँनी.” शिकागो-मियामीचा रहिवासी वॉकर अनेक वर्ष मॉडेलिंग करत होता. Sarah Arjuna : धुरंधर फेम अभिनेत्रीचा चाहत्यांसाठी खास संदेश! आवाहन करत म्हणाली “जर तुम्हाला माझ्या नावाने….” नोव्हेंबर 2025 मध्ये अनंत अंबानीच्या लग्नातही अनन्या आणि वॉकर यांना एकत्र पाहिलं गेलं होतं. याआधी अनन्या पांडे तिच्यापेक्षा मोठा असलेल्या आदित्य रॉय कपूरसोबत रिलेशनमध्ये होती. मात्र 2024 मध्ये दोघांचं ब्रेकअप झालं. त्यानंतर अनन्याचं नाव वॉकरशी जोडलं जात आहे. अनन्याच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झाल्यास तिचे ‘कॉल मी बेब’ आणि ‘खो गये हम कहां’ सारखे चित्रपट हिट ठरले. ती अलीकडेच कार्तिक आर्यनसोबत ‘तू मेरी मैं तोरा मैं तेरा तू मेरी’ या चित्रपटात दिसली. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर विशेष यश मिळवू शकला नाही. आता लवकरच ती धर्मा प्रोडक्शन्सच्या रोमँटिक कॉमेडी ‘चांद मेरा दिल’ या चित्रपटात झळकणार आहेत. हा चित्रपट ८ मे २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. हेही वाचा: Hingoli News : बम बम भोले!!! महाशिवरात्रीच्या निमित्ताने औंढा नागनाथ येथे भाविकांची मोठी गर्दी