अनन्याने केली हिप सर्जरी ?

Bollywood News । अभिनेत्री अनन्या पांडेने वयाच्या १८ व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिने कमी वेळात चित्रपटातील तिच्या अभिनयामुळे चाहत्यांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे.ती सोशल मीडियावर सक्रिय असते. नुकतेच तिने सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले. जे आता चांगलेच चर्चेत आले आहे.
View this post on Instagram
सोशल मीडियावर अनन्याने शेअर केलेल्या फोटोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. चाहते आणि युजर्सने या फोटोवरून तिने हिप सर्जरी केली असल्याचा अंदाज लावत आहे. अनन्याने तिच्या इन्स्टा हँडलवर स्वतःचा एक मिरर सेल्फी शेअर केला. फोटोमध्ये अनन्याने नूडल स्ट्रॅपसह ग्रे बॉडीकॉन ड्रेस परिधान केला होता. मेकअप आणि बन हेअरस्टाइलने तिचा लूक पूर्ण केला. अभिनेत्रीने फोटोमध्ये तिच्या वॉर्डरोबची झलकही दाखवली.
या फोटोवर युजर्सने तिने हिप सर्जरी केली असल्याचा दावा केला आहे. यावरून चर्चेला उधाण आले. यावरून तिला ट्रोलही करण्यात आले आहे मात्र यावर चाहत्यांनी तिची बाजू मांडत हा दावा खोटा असल्याचे सांगितले आहे.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्री लवकरच ‘कॉल मी बे’ ओटीटी मालिकेत दिसणार आहे. ज्याची निर्मिती इशिता मोईत्रा यांनी केली आहे आणि कॉलिन डी कुन्हा दिग्दर्शित आहे, ज्यामध्ये वीर दास, गुरफतेह पिरजादा, विहान सामत, वरुण सूद, मुस्कान जाफरी, लिसा मिश्रा, निहारिका लिरा दत्त आणि मिनी माथुर यांच्याही भूमिका आहेत.





