‘Kurla to Vengurla’ movie teaser : माती आणि नाती जोडणारी रंजक गोष्ट; ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ सिनेमाचा टीझर रिलीज

‘Kurla to Vengurla’ movie teaser : नुकताच ‘कुर्ला टू वेंगुर्ला‘ सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे. या सिनेमात उत्तमोत्तम कलाकार पाहायला मिळत आहे. विजय कलमकर यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. हा सिनेमा १९ सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. तरणांचा न होणाऱ्या लग्नाचा विषय या सिनेमात दाखविण्यात आला असून, माती आणि नाती जोडणारी एक धमाल गोष्ट कुर्ला टू वेंगुर्ला सिनेमा दाखविण्यात आली आहे.
अभिनेता प्रल्हाद कुडतरकर, वीणा जामकर, वैभव मांगले या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत. सिने कथा कीर्तन, चंद्रभागा स्टुडिओज आणि ऑरा प्रोडक्शन्स यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. अभिनेते सुनील तावडे, स्वानंदी टिकेकर, साईंकित कामत अशी उत्तम स्टारकास्ट या सिनेमात आहे. सध्याच्या घडीला तरुणांची लग्न ठरत नाहीत, त्यामुळे त्यांच वय वाढत चाललेलं आहे. ही खरंतर गंभीर गोष्ट आहेत. तरुणांच लग्न न होण्यामागची अनेक कारणं आहेत. या कारणांचा शोध या सिनेमातून घेण्यात आला आहे.
या सिनेमात मुलींच्या वाढत असलेल्या आकांक्षा यासह अनेक सामाजिक मुद्द्यांवर भाष्य करण्यात आलं आहे. खरंतर या विषयाची मांडणी अत्यंत रंजक पद्धतीने करण्यात आल्याचं या सिनेमाच्या टीझरमथ्ये दिसतं. या सिनेमाची कथा ही कोकणात जात असल्याने कोकणातील इरसाल स्वभावाची माणसे दाखवत आली आहेत.
हेही वाचा : शाहरुख खानच्या ‘किंग’ चित्रपटाला ब्रेक; चाहत्यांना आणखी वाट पाहावी लागणार





