अभिजीत खांडकेकरने शेअर केली भावनिक पोस्ट; म्हणाला “अडीच वर्षांचा प्रवास…”

Abhijeet Khandkekar Post | ‘तुझेच मी गीत आहे’ या मालिकेतून अभिनेता अभिजीत खांडकेकर प्रेक्षकांच्या भेटीस येत होता. मात्र ह्या लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. यानिमित्त या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता अभिजीत खांडकेकर याने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहिली आहे.
अभिजीत खांडकेकरची पोस्ट
‘अडीच वर्षांचा प्रवास आज अखेर संपतोय. प्रत्येक मालिकेच्या निमित्तानं कलाकारांचं एक नवं कुटुंब तयार होतं. त्यांच्या बरोबर आम्ही हसतो, रडतो, भांडतो, खिदळतो आणि अचानक एकेदिवशी आता उद्याचा कॉल टाइम येणार नाही, “ए तू किती वाजता उद्या?”, “आज डब्यात तूझ्यासाठी खास आणतेय हा.”, “ च्यायला ट्राफिक लागला यार आज खूप”, “चलो चलो जल्दी घर जाना है” हे सगळे संवाद बंद होणार ही कल्पनाच सहन होत नाही.
आता हा चॅप्टर संपवून नवीन काहीतरी सुरू होईल हे सिंक इन व्हायलाच वेळ लागतो. पण आम्हा ॲक्टर्सचं हे असंच असतं. तरीही ‘तुझेच..’च्या निमित्ताने तयार झालेले हे बंध आयुष्यभरासाठी आहेत. अवनी तायवडे, अवनी जोशी म्हणजेच स्वरा आणि पिहूने मला बापपणाचा अनुभव दिला. कांचन गुप्तेनं आईसारखी माया दिली. सचिन, उमेश , शैलेश , हार्दिक , विघ्नेश , केदार , प्रथमेश, सागर ,अभिजीतच्या रूपात भाऊ भेटले. Abhijeet Khandkekar Post |
View this post on Instagram
पल्लवीसारखी आदर्श वहिनी, बहीण भेटली. प्रिया, तेजस्विनी, उर्मिलासारख्या आयुष्यभराच्या मैत्रिणी.. प्रत्येकाबद्दल भरपूर लिहिता येईल… पण ते लिहिण्यापेक्षा एका कडकडीत मिठीतून जास्त नीट पोहोचेल. सतिश राजवाडे सर, अजिंक्य, मधुरा, महिपालजी, अभिजीत गुरू, वर्षा, उत्तरा, सुवर्णा ताई, संपूर्ण ट्रम्पकार्ड टीम आणि स्टार प्रवाह टीमचे मनापासून आभार. रसिक प्रेक्षकांना दंडवत, तुमच्या प्रेमाशिवाय हे शक्य नाही.
”तुझेच मी गीत गात आहे’च्या निमित्ताने वडील आणि मुलीची शेवटी भेट होते आणि त्याचा शेवटचा भाग आज ‘फादर्स डे’च्या निमित्ताने प्रसारित झाला आहे. याहून अनोखा योगायोग अजून कुठला. पुन्हा नव्या भूमिकेतून आपल्या समोर येत राहीनच. असंच प्रेम आणि आशिर्वाद असू द्या’, अशा शब्दांत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सध्या त्याच्या पोस्टला चाहत्यांचा देखील प्रतिसाद मिळत आहे. Abhijeet Khandkekar Post |
दरम्यान, या मालिकेत अभिजीतसह अभिनेत्री उर्मिला कोठारे देखील पाहायला मिळाली. यातील तिच्या नव्या भूमिकाला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.
हेही वाचा :





