गुजरातच्या कच्छमध्ये भूकंपाचे धक्के
Updated On:

नवी दिल्ली – गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात बुधवारी दुपारी भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर 4.1 एवढी भूकंपाची तीव्रता नोंदवण्यात आली. गांधीनगरस्थित भूकंपविज्ञान संशोधन संस्थेच्या (आयएसआर) अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी 2 वाजून 09 मिनिटांनी हे धक्के जाणवले. कच्छमधील दुधाई गावापासून सात किमी अंतरावर उत्तरेस भूकंपाचा केद्रबिंदू होता.
या भूकंपात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे. याआधी बुधवारी सकाळी सौराष्ट्र भागातील जामनगर जिल्ह्यात 2.3 तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले होते. या भूकंपाचा केंद्रबिंदू जामनगरमधील लालपूरच्या पूर्व-उत्तरेस 19 किमी दूर अंतरावर होता.




