Amruta Fadnavis : “आज मराठी माणसाने…”; महापालिकेच्या निकालानंतर अमृता फडणवीसांनी केले मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन !

Amruta Fadnavis | Devendra Fadnavis : राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल समोर येत असून अनेक ठिकाणी भाजप आणि शिवसेना युती आघाडीवर आहे. काही महापालिकांमध्ये काँग्रेसनेही चांगली कामगिरी केली असली, तरी एकूण चित्र महायुतीच्या बाजूने झुकलेले दिसत आहे.
मुंबई महानगरपालिकेत ठाकरे बंधूंच्या प्रभावामुळे शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेची कामगिरी लक्षवेधी ठरली असली, तरी भाजप व महायुती बहुमताच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे स्पष्ट होत आहे.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील भाजप कार्यालयात भेट देत विजयी कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला.
मुंबई तसेच राज्यातील इतर महापालिकांच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी भाजपाच्या सर्वचकार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.
आज मराठी माणसाने विकासकामांना महत्व देणाऱ्या, प्रगती साधणाऱ्या पक्षाला भरभरून मतदान करीत आपली पसंती दिली आहे आणि मराठी माणसावरून ,भाषा ,प्रांतावरून निरर्थक भेदभावाचे राजकारण करणाऱ्यांना सूचक संदेश दिलेला आहे.
अभिनंदन श्री @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra pic.twitter.com/dVyXnn7P4q— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) January 16, 2026
“आज मराठी माणसाने विकासकामांना महत्व देणाऱ्या, प्रगती साधणाऱ्या पक्षाला भरभरून मतदान करीत आपली पसंती दिली आहे आणि मराठी माणसावरून ,भाषा ,प्रांतावरून निरर्थक भेदभावाचे राजकारण करणाऱ्यांना सूचक संदेश दिलेला आहे. अभिनंदन देवेंद्र फडणवीस.!’ असं त्यांनी म्हंटलं आहे.





