Amruta Fadnavis : इस बार तेरे शहर में.! अमृता फडणवीसांचं नवं गाणं रिलीज, पाहा Video

Amruta Fadnavis : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या सामाजिक कार्यासह आपल्या गायनाची कला देखील जोपासत असतात. यापूर्वी अमृता फडणवीस यांनी गायलेल्या अनेक गाण्यांना त्यांच्या चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले आहे. अश्यातच आता अमृता फडणवीस यांचं आणखी एक नवीन गाणं सर्वांच्या भेटीला आहे.
स्वतः त्यांनी आपल्या सोशल मीडिया आकाउंटवर या गाण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. “इस बार तेरे शहर में, जो सावन आया है, उसे मेरी आँखों ने … बरसना सिखाया हैं !” असे या गाण्याचे बोल आहेत. त्यांच्या या नवीन गाण्याला चाहत्यांचे भरभरून प्रेम मिळालं असल्याचं दिसत आहे. युट्युब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर हे गाणं लाखोंच्या घरात गेलं आहे.
अमृता फडणवीस या अनेकदा चर्चेत असतात. कधी त्या विरोधकांवर केलेल्या टोमणे मारणाऱ्या राजकीय वक्तव्यांमुळे प्रसिद्धीच्या झोतात येते, तर कधी त्यांच्या म्युझिक अल्बममुळे किंवा सामाजिक कार्यामुळे लोकांच्या नजरेत येतात.
अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं – Video





