Amruta Dhongade : ‘आली लखाबाई’ गाण्याचा धुमाकूळ! अमृता धोंगडेंचा लोकपरंपरा जपणारा रांगडा अंदाज
Amruta Dhongade : गाण्यातून देवी लखाबाईवरील श्रद्धा, भक्ती आणि नवस यांची कथा गाण्यातून मांडण्यात आली

Amruta Dhongade : अभिनेत्री अमृता धोंगडे एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. तिचं ‘आली लखाबाई’ हे नवीन गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून अल्पावधीतच या गाण्याने रसिकांची मनं जिंकली आहेत.
अभिनेत्री अमृता धोंगडेच्या दमदार अभिनयाने आणि आकर्षक नृत्यसादरीकरणाने सजलेलं हे गाणं सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. ग्रामीण संस्कृतीचा वारसा, पारंपरिक लोककलेचा रंग आणि उत्सवमय वातावरण यांचा सुंदर संगम या गाण्यात पाहायला मिळतो.
या गाण्यात अमृता धोंगडेने ‘लखाबाई’ हे पात्र साकारलं आहे. यातील तिचा पारंपरिक रांगडा अंदाज अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. विशेष म्हणजे गाण्यातील तिचा रौद्रावतार आणि पारंपरिक लूक प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला आहे.
View this post on Instagram
या गाण्याची निर्माती आणि प्रमुख अभिनेत्री अमृता धोंगडेने आनंद व्यक्त करत म्हंटले की, “‘आली लखाबाई’ हे गाणं माझ्यासाठी खास आहे. या गाण्यात अभिनेत्री म्हणून काम करताना निर्माती म्हणूनही स्वतःला सिद्ध करण्याची संधी मला मिळाली. संपूर्ण टीमने प्रत्येक टप्प्यावर खूप मेहनत घेतली असून प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद आमच्यासाठी आनंद देणारा आहे.”
दरम्यान, ‘आली लखाबाई’ या गाण्यातून देवी लखाबाईवरील श्रद्धा, भक्ती आणि नवस यांची कथा गाण्यातून मांडण्यात आली आहे. या गाण्यामध्ये दाखविण्यात आलेले व्हीएफएक्स व कलाकारांचा खास लूक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे.
‘आली लखाबाई’ गाण्याचे संगीत आणि निर्मिती हितेश मोडक यांनी केली असून, राजू मांडलिक यांनी हे गाणे लिहिले आहे. सौरभ साळुंखे आणि ईश्वरी बाविस्कर यांनी हे गाणे गायले असून, सचिन कांबळे यांनी गाण्याचे दिग्दर्शन केले आहे.
हेही वाचा:
Pune News : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! तीन महिने ‘हा’ पूल बंद राहणार; वाहतुकीचा मोठा खोळंबा





