१८ तारखेला करणार मोठी घोषणा – अमोल कोल्हे
Updated On:

मुंबई – शिरुर लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचे खासदार म्हणून निवडून आलेले डॉ. अमोल कोल्हे १८ तारखेला एक मोठी घोषणा करणार आहेत. त्यांनी आपल्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली असून, ‘आपण येत्या १८ डिंबेरला एक मोठी घोषणा करणार आहे’. असं म्हंटल आहे.
दरम्यान, अमोल कोल्हे यांच्या या व्यक्तव्यामुळे आता राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. कोल्हेंनी शिरूर मतदारसंघातून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आढळराव शिवाजीराव पाटील यांचा पराभव केला होता.





