Amitabh Bachchan | बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मिडियावर सक्रिय असतात. सातत्याने ते पोस्ट शेअर करताना दिसतात. अनेकदा त्यांना सोशल मिडियावर ट्रोलही केले जाते. नुकतेच त्यांनी मराठीतून एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्यावरून चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. अमिताभ बच्चन यांनी मराठी भाषेत एक पोस्ट लिहून भाषेचे महत्त्व अधोरेखित केले. मराठी शिकण्याचा प्रयत्न करण्याबद्दल ही पोस्ट आहे. त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले, “कोणीतरी मला सांगितले की तुला मराठी येत नाही आणि तू इतक्या वर्षांपासून मुंबईत राहतोस. हे खरे आहे, पण ते शिकण्याचा प्रयत्न कर, हे शिकणे देखील एक सलाम आहे.” मराठी शिकण्याचा प्रयत्न करत असल्याने काही नेटकऱ्यांनी अमिताभ बच्चन यांचं कौतुक केलं आहे. तर काही जणांनी त्यांनी केलेल्या पोस्टवरून त्यांना ट्रोल केलं आहे. गुगल ट्रान्सलेट केलं आहे, चॅट जीपीटी वापरलं आहे, असं काहींनी म्हटलं आहे. Amitabh Bachchan | काही नेटकऱ्यांनी त्यांच्यावर टीका करत लिहिले की, ‘तुम्ही हे गूगल ट्रान्सलेटरमधून भाषांतर केलं आहे, ते चुकीचं भाषांतर झालं आहे, कारण वाक्यांची रचना आणि शब्दांची बांधणी थोडी चुकीचं वाटत आहे,’ ‘गुगल ट्रान्सलेटपेक्षा प्रत्यक्ष मराठी शिकून लिहिल्यास आणखी चांगलं वाटेल’, असा सल्लाही त्यांना एकाने दिला. Amitabh Bachchan | तर काहींनी त्यांचे कौतुक करत लिहिले की, ‘मराठी तुम्ही शिकत आहात, त्या बद्दल आभार,’ ‘हे जर खरंच तुम्ही लिहिलं असेल तर तुम्ही मराठी शिकला आहात, तुमच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे,’ असे म्हणत त्यांना प्रतिसाद देखील दिला आहे. हेही वाचा: अॅपल कंपनीकडून मिळणार सरप्राईज; उद्या लाँच होणार iPhone 17; किंमत आणि फीचर्स जाणून घ्या…