Amitabh Bachchan video : “उभं राहून पॅन्ट घालणही मुश्किल बनलयं…” वाढत्या वयामुळे भेडसावणाऱ्या समस्येबाबत बिग बींनी स्पष्टचं सागितलं म्हणाले…

Amitabh Bachchan video : बॅालिवूड इंडस्ट्रीचे महानायक सर्वांचे लाडके बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांनी वयाची ऐंशी पार केली आहे. ते आता ८२ च्या घरात गेले आहेत. वय वाढलं तरी न थकता ते तितक्याच जोमाने आपलं काम करताना दिसतात. पण नुकत्याच केलेल्या ब्लॅागमधून त्यांनी वाढतं वय आणि त्यामुळे भेडसावणाऱ्या समस्या यावर भाष्य केलं आहे.
अगदी लहान सहान कामं करताना आता जास्त लक्ष द्यावं लागलं आणि मेहनतही घ्यावी लागते, असं बिग बी त्यांच्या ब्लॅागमध्ये म्हणाले आहेत. आता पॅन्ट घालणंही सोपं राहिलेलं नाही. यासंबंधीचा एक किस्सा बिग बी यांनी शेअर केला आहे. डॉक्टरांनी सांगितलं की, मिस्टर बच्चन, बसून पॅन्ट घाला, उभं राहून घालू नका, नाहीतर तोल जाऊन पडू शकता…
हे ऐकून बच्चन यांना हसू आलं पण नंतर त्यांच्या लक्षात आलं की ते बरोबर बोलत होते. त्यांनी या ब्लॅागमधून त्यांचं डेली रुटीन कसं असतं याविषयी सांगितलं आहे. दररोज नियोजित वेळत प्राणायाम करणं, जिममध्ये सक्रिय होणं, संतुलन राखणं, गरजेचं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. याशिवाय पूर्वीच्या सवयी ज्या सोप्या वाटत होत्या, त्या आता पुन्हा सुरू करणं कठीण आहे. असंही ते म्हणाले आहेत.
View this post on Instagram
तरुणपणात आपण सगळ्या आव्हानांना आत्मविश्वासाने सामोरे जातो, पण वय वाढलं की, आयुष्याला जणू काही स्पीडब्रेकर लागतो. ही एक अशी हार आहे, जिचा स्वीकार करणंच योग्य ठरतं. तुमचं अस्तित्व पूर्ण झालं, आता थोडं बाजूला व्हा. हे थोडं गंभीर वाटू शकतं, पण हेच सत्य आहे, असं महत्वाचं निरीक्षण त्यांनी व्यक्त केलं आहे.
त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओवर चाहत्यांनी अमिताभ यांना काळजी घेण्याचं आवाहन करणाऱ्या कमेंट्स केल्या आहेत. मात्र, हा ब्लॅाग करताना त्यांचा उत्साह कुठेही ढळमळलेला दिसत नाही. त्यांची जिद्द चिकाटी याची चणूक म्हणजे हा व्हिडीओ आहे. बिग बी सध्या ‘कौन बनेगा करोडपती’च्या नव्या सीझनमध्ये बिझी आहेत.





