Mumbai Rain: मुंबईतील पावसाने जलमग्न झाला अमिताभ बच्चन यांचा ‘जलसा’ बंगला

Mumbai Rain: मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात हाहाकार माजला आहे. रस्ते पाण्याखाली गेले आहेत, वाहतूक विस्कळीत झाली आहे आणि सामान्यांचे जनजीवनही विस्कळीत झाले आहे. या पावसाचा फटका फक्त सर्वसामान्यांनाच नाही तर सेलिब्रिटींनाही बसला आहे. अमिताभ बच्चन यांचा ‘जलसा’ बंगला पाण्यात बुडाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
जलसा परिसर पाण्याखाली
व्हिडिओमध्ये ‘जलसा’च्या आवारात पाणी साचलेले दिसत आहे. इतकंच नाही तर घराच्या गेटबाहेर रस्त्यावर घोट्यापर्यंत पाणी साचलं आहे, ज्यामुळे तो रस्ता नदीसारखी दिसत आहे. सोशल मीडियावर काहीजण विनोद करत आहेत की, स्वतः अमिताभ बच्चन यांना पाणी काढण्यासाठी हातात वायपर घेऊन बाहेर उतरावं लागलं.
मुंबईतील अनेक खालचे भाग पाण्याखाली गेले आहेत. अनेक घरात पाणी शिरलं असून इमारतींच्या तळमजल्यात पाणी भरल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
शाळा-कॉलेजला सुट्टी
मुंबईत पावसाचं जोरदार आगमन सुरूच असल्याने बीएमसीने खबरदारी म्हणून शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. रोजंदारी करणाऱ्या लोकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
निसर्गाच्या रौद्र रुपापासून कोणीही सुटले नाही
मुंबईच्या पावसाने हे स्पष्ट केलं आहे की निसर्गाच्या रौद्र रूपापासून कुणीही वाचू शकत नाही. सामान्य माणूस असो वा मोठा सेलिब्रिटी, प्रत्येकाला त्रास सहन करावा लागत आहे. अमिताभ बच्चन यांचा बंगला पाण्यात बुडाल्याची घटना त्याचं ठळक उदाहरण आहे.





