‘बिनशर्ट’च्या वक्तव्यावर अमित ठाकरेंचं काका उद्धव ठाकरेंना उत्तर,’राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा दिल्याने ज्यांचा मुलगा..’

Amit Thackeray । शिवसेनेच्या 58 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ठाकरे गटाकडून नुकताच मुंबईत षण्मुखानंद सभागृह येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटासह मनसेवर सडकून टीका केली.
लोकसभा निवडणुकीमुळे मित्र कोण आणि शत्रू कोण हे समोर आलं. काही जणांनी केवळ उद्धव ठाकरे नको म्हणून ‘बिन-शर्ट’ पाठिंबा दिला. उघड पाठिंबा म्हणजे बिनशर्ट पाठिंबा दिला, तर काही जणांनी भाजपाला विरोध करण्याचे नाटक करून पाठिंबा दिला. मात्र, आम्ही नाटक करणारी माणसं नाही. नाटक ही कला आहे. आणि ही कला मोदींना जमते आम्हाला जमत नाही”, अशी अप्रत्यक्ष टीका उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यावर वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना केली होती. यावर आता मनसे नेत्यांकडून प्रतिउत्तर दिले जात आहे.
हिरव्या मतांच्या जोरावर यश मिळवल्या मुळे काही लोक पांचट जोक मारत आहेत पण येणाऱ्या निवडणुकीत मराठी माणूस यांची चड्डी पण शाबूत ठेवणार नाही.
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) June 20, 2024
मनसे नेते संदीप देशपांडे ‘हिरव्या मतांच्या जोरावर यश मिळवल्या मुळे काही लोक पांचट जोक मारत आहेत पण येणाऱ्या निवडणुकीत मराठी माणूस यांची चड्डी पण शाबूत ठेवणार नाही. असं म्हणत सडेतोड उत्तर दिल आहे. तर आज अमित ठाकरे यांनी सुद्धा उद्धव ठाकरेंचा विनोद मला कळायलाही दहा मिनिटं लागली. असं म्हणत टोला लगावला आहे.
नेमकं काय म्हणाले अमित ठाकरे
“उद्धव ठाकरेंचा विनोद मला कळायलाही दहा मिनिटं लागली. वरळीत त्यांना जेव्हा बिनशर्त पाठिंबा दिला तेव्हा त्यांना काही वाटलं नाही. तेव्हा त्यांनी तो घेतला आणि मुलाला आमदार केलं. पण या गोष्टी विसरायला नकोत. राज ठाकरेंनी जो पक्ष काढला आहे तो स्वतःच्या मेहनतीवर काढला आहे. पक्ष मोठा व्हायला वेळ लागला असेल तरीही तो आपल्या मेहनीतवर काढलेला पक्ष आहे हे कुणी विसरु नये. विधानसभा निवडणुकीत आम्ही आमची शक्ती दाखवू.” असं म्हणत अमित ठाकरेंनी काका उद्धव ठाकरेंना उत्तर दिलं आहे.




