लक्ष्मण हाकेंना सरकारी शिष्टमंडळ भेटताच पंकजा मुंडेंनी केली मागणी,’…सरकारने स्पष्ट करावे’

OBC Reservation । ओबीसीमधून मराठा आरक्षण देण्याची मागणी मागच्या काही दिवसांपासून सुरु आहे. मात्र ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, या मागणीसाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे नऊ दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या भेटीसाठी आज राज्यसरकारच्या शिष्टमंडळाने लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या उपोषणस्थळी भेट घेतली. या भेटीवेळी शिष्टमंडळाने त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र हाके आणि वाघमारे आंदोलनावर ठाम आहेत. यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी लक्ष्मण हाके यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून चर्चा करून दिली.
राज्यातील काही महत्वाच्या नेत्यांचे शिष्टमंडळ हे लक्ष्मण हाके यांना वडीगोद्री येथे जाऊन भेटल्याचे समजते. ते योग्यच आहे. हाकेंचे उपोषण हे त्यांचे नसून हा कायद्याच्या चौकटीत सर्वाना समान न्याय व सन्मान देण्यासंदर्भातील आवश्यकता आहे. सत्तेचा गैरवापर करुन किंवा दबावाखाली चुकीचे…
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) June 21, 2024
या भेटीनंतर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी लक्ष्मण हाके यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर पंकजा मुंडे यांनी सोशल मिडीया एक्सवरती देखील पोस्ट शेअर केली आहे. पंकजा मुंडे यांनी आपल्या पोस्टमध्ये ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागणार नाही, हे सरकारने स्पष्ट करावे, असे म्हटले आहे.
OBC Reservation । पंकजा मुंडे यांनी आपल्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलं?
राज्यातील काही महत्वाच्या नेत्यांचे शिष्टमंडळ हे लक्ष्मण हाके यांना वडीगोद्री येथे जाऊन भेटल्याचे समजते. ते योग्यच आहे. हाकेंचे उपोषण हे त्यांचे नसून हा कायद्याच्या चौकटीत सर्वाना समान न्याय व सन्मान देण्यासंदर्भातील आवश्यकता आहे. सत्तेचा गैरवापर करुन किंवा दबावाखाली चुकीचे सर्टिफिकेट दिले गेले आहेत का? असल्यास त्याची चौकशी करावी, तसेच ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागत नाही याबद्दलची स्पष्टता करावी. या साध्या त्यांच्या दोन मागण्या इतर मागण्यांसमवेत आहेत. शिष्टमंडळाने उपोषणास भेट दिली असली तरी राज्याच्या प्रमुखांनी तिथे जाऊन भेट द्यावी, म्हणजे या समस्त राज्यातील बहुजनांना सन्मान दिल्यासारखे होईल अशी माझी आग्रहाची विनंती आहे आणि ती मान्यच कराल हा मला विश्वास आहे.





