Amit Thackeray : ‘शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांच्या बाजूला मोदींचा फोटो कशाला?’ अमित ठाकरेंचा सवाल
Amit Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे (MNVS) अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या पुणे दौऱ्यादरम्यान एका घटनेमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

Amit Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या पुणे दौऱ्यादरम्यान घडलेल्या एका प्रकाराची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. सरकारी तंत्रशिक्षण महाविद्यालयाच्या पाहणीदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोंच्या शेजारी लावण्यात आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोवर अमित ठाकरे यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी मोदींचा फोटो तेथून हटवला. (Amit Thackeray)
अमित ठाकरे सोमवारी शिवाजीनगर येथील सरकारी तंत्रशिक्षण महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधांची पाहणी करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी कँटिनमधील जेवणाची गुणवत्ता आणि स्पोर्ट्स कोट्यातील विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षक उपलब्ध नसल्याबाबत महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकांकडे विचारणा केली. (Amit Thackeray)
‘शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांच्या बाजूला मोदींचा फोटो कशाला?’
अमित ठाकरे मुख्याध्यापकांच्या कार्यालयात असताना एका विद्यार्थ्याने त्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शेजारी नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात आल्याचे विद्यार्थ्याने सांगितले. (Amit Thackeray)
यावर अमित ठाकरे यांनी “छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाजूला नरेंद्र मोदी यांचा फोटो कशाला?” असा सवाल मुख्याध्यापकांना केला. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदी यांचा फोटो तेथून खाली उतरवला. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यावरून पुण्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. (Amit Thackeray)
अमित ठाकरेंनी फोटो हटवण्याच्या कृतीचं समर्थन केलं
अमित ठाकरे यांनी या कृतीचं समर्थन केलं आहे. सरकारी महाविद्यालयात पंतप्रधानांचा फोटो लावण्याचा काही प्रोटोकॉल असेल, तर तो फोटो दुसऱ्या ठिकाणी लावावा; मात्र छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शेजारी तो लावू नये, अशी भूमिका त्यांनी मांडली. (Amit Thackeray)
“नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी होऊ शकत नाही. मोदींना एवढ्या थराला नेऊन ठेवू नका,” असे अमित ठाकरे यांनी म्हटले. (Amit Thackeray)
तसेच, भाजप नेते या कृतीचा निषेध करत असतील, तर त्यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि नरेंद्र मोदी यांची तुलना मान्य आहे का, असा सवालही त्यांनी केला. “आम्ही महाराजांचा अपमान सहन करणार नाही,” असेही अमित ठाकरे यांनी स्पष्ट केले. (Amit Thackeray)
भाजपकडून अमित ठाकरेंवर टीका
दरम्यान, भाजपचे नगरसेवक नवनाथ बन यांनी या प्रकारावरून अमित ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अपमान करण्याचे काम अमित ठाकरे यांनी केले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा,” अशी मागणी त्यांनी केली. (Amit Thackeray)
सरकारी कार्यालयांमध्ये काही प्रोटोकॉल असतात. मोदींचा फोटो हटवण्यापूर्वी अमित ठाकरेंनी प्रोटोकॉल समजून घ्यायला हवा होता, असा टोला नवनाथ बन यांनी लगावला. (Amit Thackeray)
पुण्यातील सात महाविद्यालयांना अमित ठाकरे देणार भेटी
दरम्यान, अमित ठाकरे पुण्यातील एकूण सात महाविद्यालयांना भेटी देणार असून, यावेळी ते ‘Gen Z’ विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या, अडचणी आणि अपेक्षा जाणून घेण्याचा प्रयत्न या दौऱ्यात केला जाणार आहे. (Amit Thackeray)
या दौऱ्यात ‘शैक्षणिक भ्रष्टाचार दहीहंडी’, विद्यार्थीनींच्या सुरक्षेसाठी रक्षाबंधन, वाडिया महाविद्यालय परिसरात होणाऱ्या सिगारेट आणि गुटखा विक्रीविरोधात कारवाईची मागणी तसेच माता रमाई आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. (Amit Thackeray)





