दिल्ली निवडणूक निकालांवर अमित शहांची पहिली प्रतिक्रिया ; म्हणाले,”जनतेने प्रदूषित यमुनेला…”

Amit Shah on Delhi Result । दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला दणदणीत विजय मिळाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निकालांवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले,’प्रदुषित यमुना आणि प्रत्येक रस्त्यावर उघडलेल्या दारूच्या दुकानांना जनतेने सडेतोड उत्तर दिला आहे. त्यासोबतच या विजयावर अमित शहा यांनी सर्व पक्ष कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे.
दिल्लीतील विजयावर प्रतिक्रिया देण्यासाठी अमित शाह यांनी त्यांच्या सोशलमीडिया अकॉउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी,”प्रथम, दिल्लीतील समस्या स्पष्ट करताना त्यांनी लिहिले की दिल्लीतील लोकांनी या मुद्द्यांवर केजरीवाल यांना त्यांची उत्तरे दिली आहेत आणि त्यांना वारंवार दिशाभूल करता येणार नाही हे सिद्ध केले आहे.” असे त्यांनी म्हटले आहे. यानंतर त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आणि ज्येष्ठ नेत्यांचे अभिनंदन केले. शेवटी त्यांनी लिहिले की पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली दिल्ली एक आदर्श राजधानी बनेल.
Amit Shah on Delhi Result ।
दिल्लीवासियों ने बता दिया कि जनता को बार-बार झूठे वादों से गुमराह नहीं किया जा सकता। जनता ने अपने वोट से गंदी यमुना, पीने का गंदा पानी, टूटी सड़कें, ओवरफ्लो होते सीवरों और हर गली में खुले शराब के ठेकों का जवाब दिया है।
दिल्ली में मिली इस भव्य जीत के लिए अपना दिन-रात एक करने वाले…
— Amit Shah (@AmitShah) February 8, 2025
अमित शाह यांनी लिहिले की, “वारंवार खोट्या आश्वासनांनी जनतेची दिशाभूल करता येत नाही हे दिल्लीकरांनी दाखवून दिले आहे. गलिच्छ यमुना, घाणेरडे पिण्याचे पाणी, तुटलेले रस्ते, तुंबलेले गटार आणि प्रत्येक रस्त्यावर उघडी दारूची दुकाने यांना जनतेने त्यांच्या मतांनी प्रतिसाद दिला आहे.
दिल्ली में झूठ के शासन का अंत हुआ है… यह अहंकार और अराजकता की हार है।
यह ‘मोदी की गारंटी’ और मोदी जी के विकास के विजन पर दिल्लीवासियों के विश्वास की जीत है।
इस प्रचंड जनादेश के लिए दिल्ली की जनता का दिल से आभार।
मोदी जी के नेतृत्व में भाजपा अपने सभी वादे पूरे कर दिल्ली को…
— Amit Shah (@AmitShah) February 8, 2025
दिल्लीतील या भव्य विजयासाठी दिवसरात्र काम करणाऱ्या सर्व भाजप कार्यकर्त्यांचे, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा जी आणि प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा जी यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. महिलांचा आदर असो, अनधिकृत वसाहतीतील रहिवाशांचा स्वाभिमान असो किंवा स्वयंरोजगाराच्या अफाट शक्यता असोत, दिल्ली आता मोदीजींच्या नेतृत्वाखाली एक आदर्श राजधानी बनेल.” असा विश्व यावेळी त्यांनी व्यक्त केला.





