अमित शाह आज लालबागच्या राजाचे घेणार दर्शन; मराठीत ट्वीट करते म्हणाले “मी मुंबईच्या…”

मुंबई – गणेशोत्सवनिमित्त लालबागचा राजाच्या (Lalbaug Raja) दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी जमली आहे. अनेक राजकीय नेते आणि बॉलीवूड कलाकारांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) देखील आज लालबागच्या राजाचे दर्शन घेणार आहे. यासाठी केंद्रीय सुरक्षा यंत्रणा आणि मुंबई पोलीस विशेष सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात येणार आहेत. याशिवाय ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या बाप्पाचेही दर्शन घेणार आहेत.
यानंतर ते वांद्रे येथील आशिष शेलारांच्या सार्वजनिक गणपतीचं दर्शन घेणार आहेत. आज दुपारी 3:30 वाजता लालबागमध्ये अमित शहा उपस्थित असणार आहेत. मात्र लालबागच्या राजाच्या गणपतीच्या दर्शनाआधी अमित शाह यांनी मराठीमध्ये ट्वीट करत माहिती दिली आहे. “संपूर्ण देशात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. आज मी मुंबईच्या जगप्रसिद्ध ‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी खूप उत्सुक आहे. वांद्रे पश्चिम मधल्या प्रसिद्ध गणेश मंडळातील बाप्पाचे मी पूजन करणार आहे”, असं ट्वीट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे.
संपूर्ण देशात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. आज मी मुंबईच्या जगप्रसिद्ध ‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी खूप उत्सुक आहे. वांद्रे पश्चिम मधल्या प्रसिद्ध गणेश मंडळातील बाप्पाचे मी पूजन करणार आहे.
संध्याकाळी सहकार चळवळीचे प्रमुख आधारस्तंभ श्री. लक्ष्मणराव इनामदार यांच्या…
— Amit Shah (@AmitShah) September 23, 2023
संध्याकाळी सहकार चळवळीचे प्रमुख आधारस्तंभ श्री. लक्ष्मणराव इनामदार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित एका विशेष कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहे, असे देखील अमित शहा यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. राज्यातील महाविकासआघाडी सरकार कोसळल्यानंतर अमित शाह यांनी गेल्यावर्षी पहिल्यांदाच लालबागच्या राजाचं दर्शन घेतले होते. यावेळी त्यांनी कुटुंबासोबत दर्शन घेतले होते. यंदाही अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहेत. लालबागच्या राजाच्या गणपतीच्या दर्शनाननंतर ते मुंबई विद्यापाठीत एका कार्यक्रमात सहभागी होऊन संध्याकाळी सात वाजता अमित शाह दिल्लीला रवाना होणार आहेत.





