Amit Shah : मुख्यमंत्रिपदाबाबत पुन्हा सस्पेन्स ! भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याची थेट अमित शहांसोबत बैठक; कोणाची एन्ट्री होणार? पाहा…

Vinod Tawde | Amit Shah : विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला असून महायुतीला प्रचंड यश मिळाले आहे. निवडणुकांचे निकाल जाहीर होताच मुख्यमंत्री कोण होणार, याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. भाजपच्या जागा जास्त असल्याने, त्यांच्याच वाट्याला मुख्यमंत्रीपद जाईल अशी अटकळ बांधली जात आहे.
मात्र शिवसेना नेत्यांकडून सातत्याने एकनाथ शिंदे यांचे नाव पुढे करण्यात येत आहे. अशातच काल राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत, भाजपाच्या मुख्यमंत्र्याला आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे. शिंदे यांनी ही घोषणा करत ते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत.
अश्यातच, आज महायुतीच्या नेत्यांची आज केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शाह यांच्यासोबत बैठक होणार आहे. अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचं नाव जाहीर होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या बैठकीला विनोद तावडेंनी देखील उपस्थित राहावं असे आदेश त्यांना अमित शहांकडून देण्यात आले आहेत.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासंदर्भात तावडे आणि अमित शाह यांच्यात चर्चा झाल्याची माहिती देखील मिळते आहे. राज्यातील परिस्थिती पाहता मुख्यमंत्री कोण असावा? यावर या दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यामुळं आज होणाऱ्या महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीपूर्वी तावडे-शहा यांच्यातील चर्चेला महत्व आहे.
विनोद तावडे यांचं नाव चर्चेत !
विनोद तावडे हा भाजपचे राष्ट्रीय महासचिव आहेत. महाराष्ट्राच्या निवडणुकीपूर्वी त्यांची देखील मुख्यमंत्रीपदासाठी नियुक्ती होऊ शकते अशा चर्चा सुरु होत्या. पण आता निकालानंतर भाजपला ज्या प्रकारे विक्रमी मताधिक्य मिळालं आहे, त्यावरुन देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. पण अद्याप भाजपनं त्यांच्या नावाची अधिकृतपणे घोषणा केलेली नाही





