अमित शाह यांची UCC संदर्भात मोठी घोषणा ; म्हणाले,”भाजप तिसऱ्यांदा सत्तेत…”

Amit Shah on UCC । केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुन्हा एकदा समान नागरी संहिता (यूसीसी) बाबत मोठे विधान केलंय. केंद्रात भाजप सलग तिसऱ्यांदा विजयी झाल्यास संपूर्ण देशात हा कायदा लागू करू, असे त्यांनी म्हटले आहे. कोणत्याही लोकशाही देशात वैयक्तिक कायदे नाहीत” असे म्हणत त्यांनी शरिया कायद्याने देश चालवायला हवा का असा सवालच त्यांनी उपस्थित केला.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अमित शाह यांनी, “देश शरियाच्या आधारावर चालवायचा का, वैयक्तिक कायद्याच्या आधारावर?” असा कोणताही देश आजवर चालला नाही. कोणत्याही लोकशाही देशात वैयक्तिक कायदा नाही. जगात असे का आहे?” असे काही सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केले.
भाजपच्या ठराव पत्रातही UCC चे आश्वासन Amit Shah on UCC ।
गृहमंत्री अमित शहा यांनी पुढे असा युक्तिवाद केला की, जगात अनेक मुस्लिम देश आहेत जिथे शरिया कायद्याचेही पालन केले जात नाही. काळ पुढे सरकला आहे. आता भारतालाही पुढे जाण्याची गरज आहे.” देशात समान नागरी संहिता लागू करणे हे भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या जाहीरनाम्यातील एक प्रमुख निवडणूक आश्वासन आहे.
‘संविधान सभेनेही UCCचे आश्वासन दिले होते’
अमित शाह पुढे म्हणाले की, ‘सर्व लोकशाही देशांमध्ये समान नागरी संहिता आहे आणि आता वेळ आली आहे की भारतानेही तेच केले पाहिजे. यूसीसी हे संविधान तयार करताना संविधान सभेने देशाला दिलेले वचन होते.अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
‘व्होट बँकेसाठी काँग्रेसचा विरोध’ Amit Shah on UCC ।
गृहमंत्र्यांनी समान नागरी संहितेवर टीका करणाऱ्या काँग्रेसवरही हल्लाबोल केला. ते म्हणाले, “धर्मनिरपेक्ष देशात सर्वांसाठी एकच कायदा नसावा का? हे धर्मनिरपेक्षतेचे सर्वात मोठे लक्षण आहे. काँग्रेस ध्रुवीकरणाला घाबरत नाही, व्होट बँकेच्या राजकारणामुळे काँग्रेस अपयशी ठरली आहे.”अशी टीका त्यांनी केली.
UCC कायदा उत्तराखंडमध्ये लागू
अमित शाह म्हणाले की, “उत्तराखंडमध्ये समान नागरी संहिता लागू झाल्यानंतर या कायद्यावर सामाजिक, न्यायिक आणि संसदीय दृष्टिकोनातून चर्चा केली जाईल. स्वातंत्र्यानंतर उत्तराखंड हे समान नागरी संहिता लागू करणारे पहिले राज्य ठरले आहे.”





