Amit Shah : अमित शहा दोन दिवसांच्या बिहार दौऱ्यावर; निवडणुकीच्या दृष्टीने रणनीती आखणार

Amit Shah – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या बिहारमधील दोन बैठकांमध्ये सहभागी होणार आहेत. एक बैठक देहरी-ओंसन येथे आणि दुसरी बेगुसराय येथे होणार आहे. दोन्ही बैठकांना पक्षाचे वरिष्ठ नेते, आमदार, संघटना आणि स्थानिक नेते, कार्यकर्ते उपस्थित राहतील. संबंधित जिल्ह्यांचे प्रभारी देखील उपस्थित राहतील. बैठकीत निवडणूक रणनीतीवर चर्चा केली जाणारआहे.
निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला जाईल आणि अमित शाह विजयाचा मंत्र देतील असे पक्षातील सूत्रांनी सांगितले. बूथ सक्षमीकरण आणि संघटना मजबूत करण्यावर चर्चा होईल. असे मानले जाते की अमित शहांचा हा दौरा भाजपच्या निवडणूक रणनीतीला बळकटी देण्यासाठी तसेच संघटनेत शिस्त आणि समन्वय वाढवण्यासाठी महत्त्वाचा ठरेल.
२०२० च्या बिहार विधानसभा निवडणुकीत, एनडीएने शहाबादमधील २२ पैकी फक्त दोन जागा जिंकल्या होत्या. महाआघाडीने १९ जागा जिंकल्या आणि बसपाने एक जागा जिंकली. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत, एनडीएला शहााबादमधील बक्सर, आरा, करकट आणि सासाराम या लोकसभा जागा जिंकता आल्या नाहीत.
या भागावर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि एनडीए दुबळी आहे अशी ठिकाणे शहा यांनी हेरली असून त्याकरता तेथे वेगळी रणनीती तयार केली जाते आहे.
अमित शाह लल्लन सिंग स्टेडियममध्ये रोहतास, कैमूर, आरा, बक्सर, गया पूर्व, गया पश्चिम, नवादा, जहानाबाद, अरवल आणि औरंगाबाद या संघटनात्मक जिल्ह्यांतील नेत्यांसोबत बैठक घेणार आहेत. दुपारी २ वाजता, ते बेगुसराय येथील रिफायनरी टाउनशिप स्पोर्ट्स ग्राउंडवर पटना ग्रामीण, पटना महानगर, बारह, नालंदा, शेखपुरा, मुंगेर, जमुई, लखीसराय, खगरिया आणि बेगुसराय या संघटनात्मक जिल्ह्यांच्या नेत्यांशी चर्चा करतील.





