“संवैधानिक पदावर राहून त्यांनी चांगलं काम केलं पण…” ; जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावर अमित शहांचे स्पष्टीकरण

Amit Shah on Jagdeep Dhankhad। उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनीपावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राजीनामा दिला होता. त्यानंतर देशभरातून केंद्र सरकारवर टीकेची झोड उठली होती. मात्र या या टीकेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तर दिले आहे. त्यांनी याविषयी बोलताना,”जगदीप धनखड हे संवैधानिक पदावर होते आणि त्यांनी चांगले कामही केले. पण त्यांच्या राजीनाम्याचा प्रश्न आहे तर त्यांनी वैयक्तिक आरोग्याच्या कारणास्तव तो दिला आहे.” असे म्हटले आहे. गृहमंत्र्यांनी एका मुलाखतीत धनखड यांच्याविषयी सांगितले आहे.
अमित शाह यांनी या मुलाखतीत, “धनखड जी संवैधानिक पदावर होते आणि त्यांच्या कार्यकाळात त्यांनी संविधानानुसार चांगले काम केले. त्यांनी आरोग्याच्या कारणांमुळे राजीनामा दिला आहे. ते जास्त लांबवण्याची आणि इतर कोणत्याही दिशेने पाहण्याची गरज नाही.”असे म्हटले आहार.
माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी २१ जुलै रोजी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला. या संदर्भात त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून आरोग्याच्या कारणांमुळे राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या अचानक राजीनाम्याबद्दल राजकीय वर्तुळात सतत चर्चा सुरू आहे की त्यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा का दिला? गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत की राजीनाम्यानंतर जगदीप धनखड कुठे आहेत?
धनखड यांच्यावर बोलण्याव्यतिरिक्त, अमित शहा यांनी काँग्रेस आणि विरोधी पक्षांवरही जोरदार हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, १३० व्या संविधान दुरुस्ती विधेयकाला विरोध करण्यामागील विरोधकांचा हेतू स्पष्ट नाही. शाह यांनी राहुल गांधी, काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या राजकारणावर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले.
अमित शहा यांचा विरोधकांवर टोमणा Amit Shah on Jagdeep Dhankhad।
गृहमंत्र्यांनी विरोधकांविषयी बोलताना, “आजही विरोधकांचा प्रयत्न असा आहे की जर ते कधी तुरुंगात गेले तर ते तिथून सरकार चालवू शकतील” असे म्हणत त्यांनी टोला लगावला. त्यासोबतच विरोधकांच्या हेतूबद्दल बोलताना अमित शाह यांनी, त्यांना हवे आहे की, “तुरुंगच मुख्यमंत्री निवासस्थान, पंतप्रधान निवासस्थान बनवावे आणि तुरुंगातूनच डीजीपी, मुख्य सचिव, कॅबिनेट सचिव किंवा गृहसचिवांना आदेश द्यावेत.”असेही त्यांनी म्हटले.
राहुल गांधींवर अमित शहा यांचे आरोप
१३० व्या संविधान दुरुस्ती विधेयकाला विरोध केल्याबद्दल काँग्रेसवर टीका करताना शहा यांनी थेट राहुल गांधींवर निशाणा साधला. ते म्हणाले, “लालू यादव यांना वाचवण्यासाठी मनमोहन सिंग यांनी आणलेला अध्यादेश राहुल गांधींनी फाडला होता. जर त्या दिवशी नैतिकता होती, तर ती आज नाही का? की तीन वेळा निवडणुका हरल्यानंतर आता नैतिकता संपली आहे?”
विधेयक मंजूर होण्याबाबत आत्मविश्वास Amit Shah on Jagdeep Dhankhad।
अमित शाह यांनी,”हे विधेयक मंजूर होईल. मला खात्री आहे की काँग्रेस पक्ष आणि विरोधी पक्षात असे अनेक लोक असतील जे नैतिकतेचे समर्थन करतील आणि नैतिक आधारावर उभे राहतील.” असेही त्यांनी यावेळी सांगितले. गृहमंत्र्यांनी राहुल गांधींच्या आउटरीच कार्यक्रमांवरही भाष्य केले आणि म्हणाले, “कार्यक्रम व्यवस्थापित करणे आणि जनतेशी संवाद साधणे यात खूप फरक आहे.”





