Amit Malviya on Malegaon Blast। २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात, विशेष एनआयए न्यायालयाने भाजपच्या माजी खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह सर्व सात आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे. यावर भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. हिंदूंची बिनशर्त माफी मागावी Amit Malviya on Malegaon Blast। भाजपचे आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करून काँग्रेस नेत्यांना लक्ष्य केले आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये, “भगव्या दहशतवादाचे चित्र उभे करण्याचे काँग्रेसचे घृणास्पद षड्यंत्र केवळ कोलमडले नाही तर कायमचे गाडले गेले आहे. या दुर्भावनापूर्ण मोहिमेचे नेतृत्व करणाऱ्या सोनिया गांधी, पी. चिदंबरम आणि सुशील कुमार शिंदे सारख्या लोकांनी सनातन धर्माची बदनामी केल्याबद्दल हिंदूंची बिनशर्त माफी मागावी.” अशी मागणी केली आहे. दरम्यान, या मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निकालाविषयी विशेष एनआयए न्यायालयाने म्हटले आहे की, “अभियोजन पक्ष आरोप सिद्ध करण्यात अपयशी ठरला आहे. यामुळे, आरोपींना संशयाचा फायदा मिळण्याचा अधिकार आहे”. त्याच वेळी, माजी भाजप खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणाल्या की,”न्यायालयाने निर्दोष मुक्तता करणे हा केवळ त्यांचा विजय नाही तर प्रत्येक ‘भगव्या’चा विजय आहे. त्यांनी पुढे म्हटले की, गेल्या १७ वर्षांपासून माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे, ‘भगव्या’चा अपमान करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना देव शिक्षा करेल.” असेही त्यांनी म्हटले. मालेगाव स्फोटात मृतांची संख्या Amit Malviya on Malegaon Blast। मालेगाव स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला आणि १०१ जण जखमी झाले. राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) खटल्यांची सुनावणी करण्यासाठी नियुक्त केलेले विशेष न्यायाधीश ए.के. लाहोटी यांनी सरकारी वकिलांच्या खटल्यातील आणि तपासातील अनेक त्रुटींवर प्रकाश टाकला आणि म्हटले की,”आरोपींना संशयाचा फायदा मिळणे आवश्यक आहे. मुंबईपासून सुमारे २०० किमी अंतरावर असलेल्या मालेगाव शहरात २९ सप्टेंबर २००८ रोजी एका मशिदीजवळ मोटारसायकलला जोडलेल्या स्फोटक यंत्राचा स्फोट झाला ज्यामध्ये सहा जण ठार झाले आणि १०० हून अधिक जण जखमी झाले.