वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात गुंतवणूकीच्या अमिषाने २ कोटींची फसवणूक; चौघांचा अटकपूर्व जामीन फेटाळाला

पुणे – वैद्यकिय शिक्षण क्षेत्रात गुंतवणूक केल्यास दुप्पट परतावा देण्याच्या अमिषाने २ कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या चौघांना न्यायालयाने दणका दिला आहे. चौघांनी अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए.एस.वाघमारे यांनी फेटाळला.
जामिनास सरकारी पक्षातर्फे मारूती वाडेकर यांनी, तर मुळ फिर्यादीच्या वतीने अॅड. रमेश खेमू राठोड यांनी विरोध केला.चौघे सराईत आहेत. शिक्षण क्षेत्रात गुंतवणूकीच्या अमिषाने फसवणूकीचे असे अनेक गुन्हे केले आहेत.
‘किर्गिस्तान’ या देशात तर त्यांना प्रवेशास बंदी घातली आहे. हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून, सखोल तपासासाठी चौघांना अटक करणे गरजेचे आहे. त्यामुळे अटकपूर्व फेटाळण्याची मावणी अॅड. वाडेकर आणि अॅड. रमेश राठोड यांनी केली.
गोपालन अनिष,मनिष कुमार अगरवाल, पराग गर्ग आणि मुकुल जैन अशी जामीन फेटाळलेल्यांची नावे आहेत. याबाबत संतोष सेवू पवार (वय ३७, रा. बावधन बुद्रुक) यांनी बावधन पोलिसात फिर्याद दिली आहे.
संतोष यांचा जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. २०१९ मध्ये संतोष यांची एका व्यक्तीच्या माध्यमातून चौघांची ओळख झाली. चौघे प्रिविन प्रेपरेटिव्ह प्रा.लि. कंपनी नोएडा उत्तरप्रदेशचे संचालक आहेत.
ही कंपनी शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे, असे संतोष यांना सांगण्यात आले होते. शिक्षण क्षेत्रात गुंतवणूक केल्यास दुप्पट परतावा देण्याचे अमिष दाखवत संतोष यांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले. संतोष याने जानेवारी २०२२ मध्ये रोख स्वरूपात १ कोटी रुपये दिले.
तर ऑनलाईन पध्दतीने १ कोती रुपये दिले. मात्र, त्यांना परतावा मिळलाच नाही. उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत होती. त्यामुळे त्यांनी पोलिसात धाव घेतली. यामध्ये चौघांनी अॅड. विपुल दुशिंग यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता.





