Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज (दि. १२) रायगडच्या दौऱ्यावर येत आहेत. येथे आल्यानंतर अमित शहा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या घरी स्नेहभोजनाला जाणार आहेत. रायगडच्या पालकमंत्रिपदाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वपूर्ण मानली जात आहे. असं असतानाच आता महायुतीमध्ये वादाचा भडका उडाल्याचे दिसत आहे. मंत्री आदिती तटकरे आणि मंत्री भरत गोगावले यांनी स्वतंत्र बैठका घेऊन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला आहे. Amit Shah | दरम्यान, अमित शाह हे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी येत आहेत. त्यांच्या या दौऱ्याचा कुणी वेगळा राजकीय अर्थ लावू नये, असं खासदार सुनील तटकरे यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे मागील सरकारचा बदल रायगडमधून झाला, हे लक्षात ठेवा. आम्ही शिवरायांचे मावळे आहोत. Aditi Tatkare | अन्याय सहन करणार नाही. योग्यवेळी योग्य निर्णय होईल आणि गोगावले हेच पालकमंत्री व्हावेत, अशी आमची ठाम अपेक्षा आहे, असा खणखणीत इशाराच शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी दिला आहे. त्यामुळे रायगडमध्ये अमित शाहांच्या दौऱ्याआधीच महायुतीत वादाचा भडका उडाल्याचं दिसत आहे. Bharat Gogavale | रायगडला निश्चितपणे न्याय मिळेल आमदार महेंद्र दळवी म्हणाले, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दौऱ्यानंतर रायगडला निश्चितपणे न्याय मिळेल, असं मला वाटतं आणि तो न्याय आमच्या बाजूंनी असेल, कारण आम्ही सारे आशावादी आहोत. जनतेने जो मॅटेंड दिले आहे, त्याचा आदर निश्चितपणे करतील, त्यामुळे आम्ही ‘वेट ॲन्ड वॉच’च्या भूमिकेत आहोत. केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यानंतर रायगडचे पालकमंत्री म्हणून भरत गोगावले यांच्या नावाची घोषणा निश्चितपणे होईल, असंही आमदार महेंद्र दळवी म्हणाले. Mahendra Dalvi | राजदरबारात भव्य मंडप राजदरबारात मुख्य कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी भव्य मंडप उभारण्यात आला आहे. शिवसमाधीच्या जीर्णोद्धाराला १०० वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त मंडळातर्फे प्रमुख पाहुण्-यांच्या हस्ते श्री शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्कार नीलकंठ पाटील यांना प्रदान करण्यात येणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज उदयसिंह होळकर आणि निवृत्त लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी यांना सन्मानित करण्यात येणार आहे. इलेक्ट्रिक बग्गीतून प्रवास अमित शाह यांच्यासह सर्व प्रमुख मान्यवर शिवसमाधीला अभिवादन करण्यासाठी रवाना होतील. होळीच्या माळापासून जगदीश्वर मंदिरापर्यंचा प्रवास ते इलेक्ट्रिक बग्गीतून करणार आहेत. त्यासाठी चार इलेक्ट्रिक बग्गी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. यासाठी होळीच्या माळापासून बाजारपेठेतून जगदीश्वर मंदिरापर्यंत मातीचा भराव टाकून तात्पुरता रस्ता तयार करण्यात आला आहे.