America : अमेरिकेत हिंदू मंदिराचे विद्रुपीकरण; भारतविरोधी ग्राफिटी रंगवली

न्यूयॉर्क – अमेरिकेत कॅलिफोर्ननियातल्या हिंदू मंदिराचे काही अज्ञात समाजकंटकांनी विद्रुपीकरण केल्याचे उघड झाले आहे. हिंदू समाजामध्ये भीती उत्पन्न करण्यासाठी करण्यात आलेली ही आणखी एक घटना आहे. सॅन बर्नार्दिनो काऊंटीतल्या चिनो हिल्स शहरातल्या बोचासान्वासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेच्या मंदिराचे विद्रुपीकरण करण्यात आल्याचे संस्थेच्यावतीने सांगण्यात आले. चिनो हिल्स लॉस एंजेलिस काउंटीच्या सीमेवर आहेत.
मंदिराचे विद्रुपीकरण करण्याची ही आणखी एक घटना आहे. यावेळी चिनो हिल्समधील मंदिराचे विद्रुपीकरण करण्यात आले. या द्विष पसरवल्या जाण्याविरोधात हिंदू समुदाय ठाम आहे. चिनो हिल्स आणि दक्षिण कॅलिफोर्नियातील समुदायासोबत आम्ही ठाम आहोत.
आम्ही कधीही द्वेषाला मूळ धरू देणार नाही, असे बीएपीएसच्या सार्वजनिक व्यवहार विभागाने एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
मानवता आणि श्रद्धा शांती आणि करुणा आपल्यातील समान मानवता कायम ठेवेल याची खात्री आहे, असे देखील या निवेदनात म्हटले आहे. मात्र या घटनेबद्दलचा कोणताही तपशील त्यात नमूद केलेला नाही.
कॅलिफोर्नियातील सर्वात मोठ्या हिंदू मंदिरात शनिवारी तोडफोड झाल्याबद्दल हिंदू अमेरिकन फाउंडेशन या स्वयंसेवी संघटनेने एफबीआय आणि त्याचे संचालक काश पटेल यांच्याकडे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
अमेरिकेत पुर्वी देखील घडलेल्या अशा घटनांकडे द कोऑलिशन ऑफ हिंदूज ऑफ नॉर्थ अमेरिका, या एका अन्य संघटनेनेही लक्ष वेधले आणि या प्रकरणांच्या तपासाची मागणी केली आहे. या प्रकरणाशी अमेरिकेतील खलिस्तानवाद्यांचा संबंध असल्याचा संशयही व्यक्त होतो आहे. लॉस एंजेलिसमध्ये खलिस्तानी सार्वमत घेतले जात असतानाच ही घटना घडणे यात आश्चर्य नाही, असे संघटनेने म्हटले आहे.





