WPL 2026 Auction : मुंबई इंडियन्सने ‘या’ खेळाडूसाठी लावली सर्वाधिक बोली! बेस प्राइसपेक्षा सहापट अधिक पैसा ओतला

मुंबईने केरसाठी मोजली सहापट अधिक किंमत –
अमेलिया केरला मुंबई इंडियन्सने मेगा ऑक्शनपूर्वी रिलीज केले होते. तिने स्वतःची बेस प्राइस ५० लाख रुपये ठेवली होती. ऑक्शन सुरू होताच यूपी वॉरियर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात केरला विकत घेण्यासाठी चढाओढ सुरू झाली. काही वेळातच किंमत १ कोटींच्या पुढे गेली आणि अखेरीस मुंबई इंडियन्सने ३ कोटी रुपयांना तिला विकत घेत बाजी मारली. बेस प्राइसपेक्षा सहापट अधिक किंमत मुंबईने केरसाठी मोजली.
मुंबईसाठी केरची भूमिका आणि टी-२० विश्वचषकातील प्रदर्शन –
#Amelia is a Mumbai-Kerr again! 😍
The prolific Kiwi all-rounder continues her #TATAWPL journey with #MumbaiIndians! 💙#TATAWPLAuction | LIVE NOW 👉 https://t.co/A1rBllld7X pic.twitter.com/wvh8jjLf31
— Star Sports (@StarSportsIndia) November 27, 2025
अमेलिया केर हिने यापूर्वीही मुंबई इंडियन्ससाठी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. डब्ल्यूपीएलच्या तिन्ही सीझनमध्ये तिने एकूण ४३७ धावा केल्या असून, गोलंदाजीत ४० विकेट्स घेतल्या आहेत. तिच्या फलंदाजी आणि गोलंदाजीतील क्षमतेमुळे ती संघाचा महत्त्वाचा भाग मानली जाते. टी-२० वर्ल्डकप २०२४ मध्येही केर हिने न्यूझीलंडला विजेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. संपूर्ण स्पर्धेत तिने १५ विकेट्स घेतल्या आणि १३५ धावा केल्या होत्या. तिच्या याच दमदार प्रदर्शनासाठी तिला ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ पुरस्काराने सन्मानित केरण्यात आले होते.
आंतरराष्ट्रीय कारकीर्द –
अमेलिया केरची गणना न्यूझीलंडच्या सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूंमध्ये होते. तिने आतापर्यंत कीवी संघासाठी ८८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यात १४५३ धावा आणि ९५ विकेट्स घेतल्या आहेत. डब्ल्यूपीएल २०२६ मध्ये अमेलिया केरची मुंबई इंडियन्समध्ये उपस्थिती संघाला अधिक मजबूत करेल आणि स्पर्धेची रंगत वाढवेल.





