Virat Kohli – टीम इंडिया टी-२० विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात पाकिस्तान संघाशी भिडण्यास सज्ज झाली आहे. भारतीय संघ विश्वचषक सुरु होण्याअगोदरच आस्ट्रेलियाला पोहोचला होता. संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक सर्व सामना खेळला आहे. तर दुसरा सर्व सामना न्यूझीलंड संघाशी खेळायचा होता. मात्र पावसाचा व्यत्यय आल्याने तो सामना रद्द करण्यात आला. आता भारतीय संघ २३ ऑक्टोबरला स्पर्धेतील पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाशी खेळणार आहे.
#T20WorldCup | रोहित शर्माची मुलाखत! टी-२० वर्ल्डकपमध्ये ‘असा’ असेल टीम इंडियाचा संपूर्ण प्लॅन
दरम्यान यंदाच्या या स्पर्धेसाठी कोरोनाबाबत कोणत्याही प्रकारचे निर्बंध लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे चाहते त्यांच्या आवडत्या खेळाडूंना भेटूही शकतात. ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय संघ पोहोचल्यानंतर अनेक चाहत्यांनी खेळाडूंसोबत फोटो काढण्याचा आनंद घेतला. चाहत्यांनी खेळाडूंसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर देखील केले आहेत. यामध्ये सोशल मीडियावर एका मुलीचा फोटो खूपच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीसोबत ( Virat Kohli ) दिसत आहे.
View this post on Instagram
भारतीय संघ ब्रिस्बेनमध्ये असताना विराट कोहली ( Virat Kohli )सोबत एका मुलीने फोटो काढला होता. यानंतर त्या मुलीने तो फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. फोटो शेअर करताच त्याला मोठ्या प्रमाणात लाईक्स आल्या आणि काही वेळातच तो फोटो व्हायरल झाला. अमिषा बसेरा असे या मुलीचे नाव असून ती ऑस्ट्रेलियातच राहते.
अमिषा मूळची भारतीय असून तिने क्वीन्सलँड विद्यापीठातून इंजिनीअरिंग केले आहे. विराट ( Virat Kohli )सोबतचा फोटो इंस्टाग्राम खात्यावर शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘ही भावना शब्दांच्या पलीकडे आहे.’ विराटसोबतच्या फोटोनंतर अमिषा सोशल मीडियावर स्टार बनली आहे. तिच्या इन्स्टाग्राम खात्यावर फॉलोअर्सची संख्या हजारांवर पोहोचली आहे.