प्रभात वृत्तसेवा तळेघर – आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील जांभोरी गावात दसऱ्याच्या मुहूर्तावर कुस्ती तालीमचे भूमिपूजन जांभोरी गावाचे लोकनियुक्त सरपंच सुनंदा पारधी व खरेदी विक्री संघांचे उपाध्यक्ष शामराव बांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. आदिवासी भागात तालीम व्हावी या साठी पै. भिवा वाळकोली यांनी सतत महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करून आदिवासी भागाचे नेते सुभाषराव मोरमारे, संजय गवारी, प्रकाश घोलप यांच्या सहकार्याने दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून दहा लाख रुपये निधी मंजूर करून घेण्यात आला. या वेळी जांभोरी गावचे पोलीस पाटील नवनाथ केंगले, पोलीस पाटील सोनाली पोटे, ज्ञानेश्वर पारधी. पुनाजी पारधी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे नेते मारुती दादा केंगले, श्री व्यंकोजी कुस्तीगीर तालीम संघटना जांभोरीचे अध्यक्ष भिवा वालकोळी, शिवाजी केंगले, सखाराम केंगले, ग्रामपंचायत सदस्य दुंदा भोकटे, ग्रामपंचायत सदस्य शिवराम केंगले, किसन पोटे, अनंता वालकोळी, सुनील वालकोळी, नामदेव भोकटे, घोडेगाव पोलिस ठाणे फौजदार शिवाजी जनार्दन केंगले, सुरेश केंगले,संजय केंगले, ग्रामसेवक सुनिल पारधी, कृषी सेवक सुनील लोहकरे, संजय केंगले गुरुजी,भिवा केंगले,दूंदा किर्वे, चंद्रकांत केंगले, पांडुरंग केंगले,राज केंगले,सर्व जांभोरी ग्रामस्थ उपस्थित होते. नवीन पिढी तयार व्हावी या उद्देश समोर ठेवून आपल्या आदिवासी भागाचे पैलवान गावचे पैलवान तालुका पातळीवर जिल्हा पातळीवर राज्य पातळीवर देश पातळीवर जाऊन आपल्या आदिवासी भागाचा गावचा अभिमान वाढावा या सफल हेतूने ११ गुंठे जागा वसंत वालकोळी,बबन केंगले, भिवा वालकोळी, अनंता वालकोळी,यांनी दिली आहे.