नगर | अमरधाम- आयुर्वेद रस्ता अंधारात ..

नगर, (प्रतिनिधी) – अमरधाम ते आयुर्वेद चौक रस्त्यावर पथदिवे नसल्याने या रस्त्यावर रात्री मोठा अंधार असतो. अपघाताचे देखील प्रकार वाढले आहेत. या रस्त्यावर तातडीने पथदिवे बसवावेत, अशी मागणी नागरिक करत आहेत.
अमरधाम ते आयुर्वेद चौक रस्त्यावर मोठी वर्दळ असते. परंतु रात्री या रस्त्यावर मोठा अंधार असतो. त्यामुळे वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दुचाकीवरून जाणाऱ्या महिलांना रस्त्यावरून भिती वाटते. या ठिकाणी लहान- मोठे अपघात
देखील होतात. रस्त्याच्या बाजूने सीना नदीपात्र आहे. झाडे- झुडपे देखील वाढलेली आहेत. त्यामुळे या ठिकाणी रात्री दिवे असणे महत्त्वाचे आहे. आयुर्वेद चौकाकडून काटवन खंडोबाकडे जाणाऱ्या रस्त्यावर देखील दिव्यांचा प्रश्न निर्माण झालेला आहे.
महापालिकेने या भागातील पथदिवे तातडीने सुरू करावेत, अशी मागणी नागरिक करत आहेत. स्थानिक नगरसेवकांनी देखील या प्रश्नासाठी महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करावा.





