क्रीडाक्षेत्रातूनही जेटली यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्‍त

नवी दिल्ली – माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निधनाबद्दल आज क्रीडाक्षेत्रातूनही दुःख व्यक्‍त करण्यत अले. क्रिकेटपटू आणि ऑलिम्पिक खेळाडूंनी जेटलींबाबत ट्‌विटरवरून सहवेदना व्यक्‍त केल्या अहेत. दिल्ली डिस्ट्रीक्‍ट क्रिकेट असोसिएअशनचे माजी अध्यक्ष या नात्याने जेटली यांचा अनेक क्रीडापटूंशी संबंध होता. त्यानिमित्ताने या सर्वांनी जेटलींबाबतच्या भावना व्यक्‍त केल्या. जेटली यांना क्रिकेटची विशेष आवड होती. बीसीसीआयबाबत जर एखादा महत्वाचा धोरणात्मक निर्णय घ्यायचा असेल, तर जेटली यांच्याशी सल्लामसलत केली जयची.

वडील बोलायला शिकवतात. पण वडिलधाऱ्या व्यक्‍ती व्यक्‍त व्हायला शिकवते. वडील नाव देतात. पण वडिलधारी व्यक्‍ती ओळख देतात. अरुण जेटली हे असेच वडिलधारे व्यक्‍ती होते. जेटली यांच्या निधनामुळे आपल्यातील एक भाग निघून गेला आहे, असे वाटते आहे, असे भारतीय क्रिकेट संघातील माजी सलामीवीर आणि भाजप खासदार गौतम गंभीर याने म्हटले आहे. तर जेटली यांच्या निधनामुळे आपल्याला अतीव दुःख झाल्याचे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने म्हटले आहे. आपल्या वडिलांच्या निधनानंतर जेटली यांनी घरी येऊन सांत्वन केल्याची आठवणही त्याने सांगितली आहे.

विरेंद्र सेहवाग, विराट कोहली, शिखर धवन, ईशांत शर्मा, युवराज सिंह, मिताली राज, आर अश्‍विन या क्रिकेटपटूंनी ट्‌विटद्वारे जेटली यांच्याबाबतच्या सहवेदना व्यक्‍त केल्या आहेत. “बीसीसीआय’चे माजी अध्यक्ष दिवंगत जगमोहन दालमिया यांचे पुत्र अविशेक दालमिया, बॉक्‍सिंगपटू मेरी कोम, ऑलिम्पिक कुस्तीपटू सुशील कुमार, बजरंग पुनीया. वीेजेंदर सिंह आणि बायचुंग भुतिया यांनीही जेटलींच्या निधनाबाबत दुःख व्यक्‍त केले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×