Pushpa 2 Collection Day 2: अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांचा चित्रपट ‘पुष्पा 2: द रुल’ ने रिलीज झाल्यापासून अनेक जुन्या चित्रपटांचे बॉक्स ऑफिस रेकॉर्ड तोडले आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ज्या वेगाने कमाई करत आहे, ते पाहता हा चित्रपट काही दिवसांतच अनेक सुपरस्टारच्या चित्रपटांचे सर्व रेकॉर्ड मोडेल असे वाटते. रिलीजच्या दुसऱ्या दिवशीही पुष्पा 2 जगभरात प्रचंड नफा कमावत आहे. हा चित्रपट 5 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. पहिल्या दिवशी सर्वात मोठी ओपनिंग करणारा चित्रपट ठरल्यानंतर दुसऱ्या दिवशीही पुष्पा २ ची क्रेझ पाहायला मिळाली.
पहिल्या दिवशी, चित्रपटाने सर्व भाषांमध्ये एकूण 174.9 कोटी रुपयांची कमाई केली, तर दुसऱ्या दिवशी भारतात 90.10 कोटी रुपयांची कमाई केली. दुस-या दिवशी त्याची कमाई थोडी कमी झाली आहे पण आठवड्याच्या शेवटी त्याची कमाई पुन्हा एकदा वेग घेईल. अल्लू अर्जुनच्या चित्रपटाने दोन दिवसांत अधिकृतपणे जगभरातील 400 कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. या चित्रपटाचे यश भारतातच नाही तर परदेशातही पाहायला मिळत आहे.
‘पुष्पा 2’ ने जग गाजवले –
सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा 2: द रुल’ बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी, सर्व भाषांमध्ये 174.9 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई करून हा चित्रपट भारतातील सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट बनला आहे. दुसऱ्या दिवशी पुष्पा 2 ने 90.01 कोटींची कमाई केली आहे. Sacnilk.com च्या मते, गेल्या दोन दिवसांत, पुष्पा 2 ने अधिकृतपणे 265 कोटी रुपयांच्या कलेक्शनसह जगभरात 400 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. चित्रपटाचे कलेक्शन पाहता, अल्लू अर्जुनची पुष्पा राजची व्यक्तिरेखा लोकांना पसंत पडत असल्याचे कळते.
‘पुष्पा 2’ ने या चित्रपटांचे रेकॉर्ड तोडले –
Sacknilk च्या मते, पुष्पा 2 ने रिलीजच्या पहिल्या दिवशी अनेक चित्रपटांचे बॉक्स ऑफिस रेकॉर्ड मोडले आहेत, ज्यात ‘RRR’, ‘बाहुबली 2’ आणि ‘KGF 2’ सारख्या ब्लॉकबस्टरचा समावेश आहे. गेल्या वर्षी रिलीज झालेल्या शाहरुख खानच्या ‘जवान’ला मागे टाकून हा सर्वात मोठा हिंदी रिलीज ठरला आहे.
अल्लू अर्जुनच्या चित्रपटाला सर्व भाषांमध्ये खूप प्रेम मिळत आहे पण त्याची कमाई हिंदी भाषेत सर्वाधिक आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने तेलुगूमधून 80.3 कोटी रुपयांची कमाई केली होती. जर आपण दोन्ही दिवसांवर नजर टाकली तर, दोन दिवसांत पुष्पा 2 ने तेलुगु व्हर्जनमधून 119.55 कोटी रुपये आणि हिंदी व्हर्जनमधून 127.2 कोटी रुपये कमावले आहेत. सुकुमार दिग्दर्शित हा चित्रपट 2021 मध्ये रिलीज झालेल्या ‘पुष्पा: द राइज’चा सिक्वेल आहे.