मुंबई : सातारा ड्रग्ज प्रकरणावरून महायुती सरकारवर हल्ला चडवत, हे सरकार अंमली पदार्थांच्या धोक्याला आळा घालण्यात अपयशी ठरले आहे आणि राज्याला अंमली पदार्थांच्या विळख्यात ढकलले जात आहे का,असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एका एक्सवरील पोस्टमध्ये केला. देवेंद्र फडणवीस सरकार ड्रग्ज उत्पादनात सामील असलेल्यांना संरक्षण देत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सपकाळ म्हणाले, मुंबई पोलिसांनी सातारा जिल्ह्यात मेफेड्रोन निर्मितीचा कारखाना उघडकीस आणून ११५ कोटी रुपयांचा अंमली पदार्थांचा साठा जप्त केला. पोलिसांनी पश्चिम बंगालमधील तीन कामगारांना अटक केली. पश्चिम बंगालमधील कामगारांना दुर्गम भागात कसे आणि कोणाच्या मदतीने ठेवण्यात आले होते. या प्रकरणात ओमकार दिघे यांच्या कथित भूमिकेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दिघे यांनी ज्या जागेवर ड्रग्ज तयार केले जात होते, त्या जागेचा वापर शिवसेना नगरसेवक प्रकाश शिंदे यांच्याशी संबंधित कामासाठी करण्याचा प्रयत्न केला होता. दिघे यांना घटनास्थळी ताब्यात घेण्यात आले होते, परंतु राजकीय दबावामुळे त्यांची नंतर सुटका करण्यात आली. ओमकार दिघे सावली गावात कधीपासून राहत होता आणि त्यांच्या वास्तव्यासाठी कोणी मदत केली. घटनास्थळी काम करणाऱ्या सुमारे ४० इतर कामगारांबद्दल आणि त्यांना पळून जाण्यासाठी कोणी मदत केली. मोरे हा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पुणे विद्यार्थी संघटनेचा प्रमुख आहे. विशाल मोरेचे ओमकार दिघे आणि प्रकाश शिंदे यांच्याशी असलेल्या कथित संबंधांवर त्यांनी स्पष्टीकरण मागितले.