नीरा नदीकाठवासीयांनो सावधान !
Updated On:

परिंचे : वीर धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढलाने वीर धरणातून नीरा नदीत पाण्याचा विसर्ग वाढवला आहे. वीर धरणामधून नीरा नदीमध्ये 800 क्युसेकने विद्युतगृहातून विसर्ग सुरू आहे.
धरणातून सोडण्यात येणा-या विसर्गमध्ये सायंकाळी वाढ करुन तो 40 हजार 462 क्युसेकने करण्यात आला आहे. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गामध्ये बदल होऊ शकतो, अशी माहिती धरण प्रशासन विभागाकडून देण्यात आली आहे. नदीकाठच्या सर्वांनी काळजी घ्यावी , नीरा नदीपात्रात कोणीही जाऊ नये. हा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.




