पिंपरी | राष्ट्रवादीच्या दांडपट्टयाने सर्वच राजकीय पक्ष हैराण

पिंपरी, (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे महत्व अधोरिखित झाल्याने या गटात अजित पवार पक्षाच्या 4 पदाधिकार्यांसह एकूण 24 जणांनी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. तर भोसरी विधानसभेवर दावा सांगणार्या शिवसेनेने शरद पवार पक्षात प्रवेश केलेल्या अजित गव्हाणे यांच्या भोसरी विधानसभेतील संभाव्य उमेदवारीचा धसका घेतला आहे. तर पक्षातील वाढत्या इनकमिंगमुळे पडत्या काळातही पक्षासोबत प्रामणिक राहणार्या अनेक पदाधिकार्यांमध्येदेखील अस्वस्थता आहे.
गेल्या दोन-तीन दिवसांत शहरात विविध राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तर चर्चेच्या केंद्रस्थानी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट राहिला आहे. भाजपमधील काही पदाधिकार्यांनी अजित पवार यांच्या महायुतीमधील समावेशाला उघडपणे केलेल्या विरोधानंतर अस्वस्थ असलेल्या अजित पवार यांच्या पक्षाला गळती लागली आहे. त्यांच्या पक्षाची पिंपरी चिंचवड शहराची धुरा खांद्यावर असलेले शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह अनेक पदाधिकार्यांचा शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश झाला आहे.
शिवसेनेच्या अपेक्षांना तडा
भोसरी विधानसभा मतदार संघ महायुतीमधील भाजपला सुटणार असल्याने अजित गव्ाहणे यांनी ‘अभी नहीं तो कभी नहीं’ याप्रमाणे थेट शरदचंद्र पवार गटाचा रस्ता धरला. तर लोकसभा निवडणुकीमध्येच विधानसभेच्या उमेदवारीची गणिते पेरण्यात आली होती.
शिरूर लोकसभा मतदार संघातील शिवसेनेची कामगिरी पाहता, भोसरी विधानसभा मतदार संघात शिवसेनेला उमेदवारी मिळण्याच्या अपेक्षेलाच गव्हाणेंच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाने तडा जाण्याच्या शक्यता निर्माण झाल्या आहेत.
त्यामुळे या मतदार संघातून इच्छूक असलेल्या जिल्हा संघटक यांनी आपल्या समर्थकांसह थेट मातोश्रीचा रस्ता धरला. मात्र, याठिकाणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट होऊ शकली नाही. मात्र शिवसेनेची होणारी अडचण त्यांनी खासदार संजय राऊत यांच्या कानावर घातली आहे. त्याचप्रमाणे पिंपरी मतदारसंघातून देखील शरद पवारांच्या राष्ट्रवादीने निवडणुकीची तयारी सुरु केली आहे.
या मतदारसंघातून शिवसेना उमेदवार उतरविते. २०१४ साली शिवसेनेचे अॅड. गौतम चाबुकस्वार विजयी झाले होते. शिवसेनेत फूट पडल्यानंतर अॅड. चाबुकस्वार हे उद्धव ठाकरेंसोबतच राहिले आणि आगामी निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरु ठेवली परंतु आता त्यांच्याही अपेक्षांना तडा जाण्याची स्िथती निर्माण झाली आहे.
अजित पवारांच्या पक्षात संभ्रम
मोठ्या संख्येने नेते पक्ष सोडून गेल्याने उर्वरित नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांमध्ये देखील संभ्रमाची स्िथती आहे. गुरुवारी पुणे येथे पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले आणि संभ्रम दूर करण्याचा प्रयत्नही केला.
परंतु सध्या पक्षाकडे शहर पातळीवर अध्यक्ष नसल्याने अध्यक्ष निवडीची प्रकि्रया हाती घ्यावी लागणार आहे. रविवारी स्वत: अजित पवार शहरात सकाळपासून ठाण मांडून बसणार आहेत आणि प्रत्येक पदाधिकाऱ्यासोबत वन टू वन चर्चा करणार आहेत.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीत असुरक्षिततेची भावन
शरद पवारांच्या राष्ट्रवादीत होणार्या मोठ्या प्रमाणावरील इनकमिंगमुळे याच पक्षांतील नेत्यांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढू लागली आहे. स्थानिक पातळीवरील मोठे नेते येत असल्याने पक्षातील आपले स्थान काय राहणार? निर्णय प्रकि्रयेत आपला सहभाग कितपत असेल? असे प्रश्न अनेक पदाधिकाऱ्यांना सतावत आहेत.
पक्षाच्या पडत्या काळातही भूमिकेवर ठाम राहणारे पदाधिकारी नव्या आगंतुकांमुळे बॅकफूटवर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रामुख्याने महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने ज्यांनी तयारी केली होती, त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात असुरक्षिततेची भावना आहे.





