आणायला अलिशान गाडी पाठवली नाही म्हणून आला राग…; राज्यपालाच्या मुलाची अधिकाऱ्याला बेदम मारहाण, बुटही चाटायला लावला

Odisha Raj Bhavan – ओडिशाचे राज्यपाल रघुबर दास यांच्या मुलाने राजभवनातील एका अधिकाऱ्याला क्षुल्लक कारणावरून बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. एका वृत्नानुसार या मुलाने व त्याच्या मित्रांनी या अधिकाऱ्याला बुटही चाटायला लावल्याचा प्रकार घडला आहे. वैकुंठ प्रधान असे मारहाण झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. ते ओडिशाच्या राजभवनात सहायक अधिकारी आहेत.
राज्यपालांचा मुलगा आणि त्यांचे मित्र रेल्वेने ओडिशात आले. त्यावेळी रेल्वे स्थानकावरत्यांना आणायला अलिशान गाडी पाठवली नाही म्हणून राग अनावर झाल्याने राज्यपालांच्या मुलाने व त्यांच्या मित्रांनी हे कृत्य केल्याचे सांगण्यात येत आहे.
या प्रकरणी संबंधीत अधिकाऱ्याने राज्याच्या मुख्य सचिवांकडे तसेच पेालिसांकडेही तक्रार केली आहे, पण त्याची दखल घेतली गेलेली नाही. वैकुंठ प्रधान हे सध्या रूग्णालयात उपचार घेत आहेत. आपल्यावर त्यांनी जीवघेणा हल्ला केला.
आपला मृत्यूच झाला असता पण आपण थोडक्यात बचावले असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. या प्रकरणी वैकुंठ यांच्या पत्नींनीही पेालिसांत जाऊन दाद मागितली आहे. राजभवनातून या प्रकरणात अद्याप कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.





