आलिया भट्टचा पॅरिस फॅशन वीकमधील हटके अंदाज; साऱ्यांचे वेधलं लक्ष

Alia Bhatt in Paris Fashion Week | बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने अभिनयासह आपल्या सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. नुकतेच तिने पॅरिस फॅशन वीकमध्ये पदार्पण केले आहे. आलियाने मेटॅलिक कॉर्सेट ड्रेस परिधान करून पॅरिस फॅशन वीकच्या रॅम्पवर दमदार एन्ट्री केली.
आलिया अलीकडेच L’Oreal ब्रँडचा एक भाग बनली आणि आता तिने पहिल्यांदाच फॅशन वीकमध्ये सहभागी होऊन सर्वांची मने जिंकली. तिने याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
View this post on Instagram
या लुकने तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. एका फोटोत ती सुपरमॉडेल हेडी क्लमसोबत फॅशन शोमध्ये बसलेली दिसत आहे. या कार्यक्रमाला आलिया भट्टची मुलगी राहा, पती रणबीर आणि सासू नीतू कपूरसोबत गेली होती. ते तिला चिअर अप करताना दिसले.
आलिया लवकरच ‘जिगरा’ चित्रपटामध्ये दिसणार आहे. हा चित्रपट 11 ऑक्टोबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात वेदांग रैना देखील आहे, जो आलियाच्या भावाच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय ती संजय लीला भन्साळी यांच्या लव्ह अँड वॉरमध्येही दिसणार आहे. यामध्ये ती तिचा पती-अभिनेते रणबीर कपूर आणि विकी कौशलसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.





