आलियाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान! अभिनेत्रीने पुरस्कार स्वीकारल्यानंतर व्यक्त केल्या भावना म्हणाली…

Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भटचा बॅालीवूड इंडस्ट्रीमधील टॉप अभिनेत्रींमध्ये समावेश होतो. तिच्या अभिनयाने ती नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत आली आहे. आता आलिया भट हिच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. तिचा आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये गोल्डन ग्लोब्स होरायझन पुरस्काराने आलियाला सन्मानित करण्यात आले आहे. हॅालीवूड अभिनेत्री हेंड साबरी हिच्यासोबत या कार्यक्रमात आलियाला सन्मानित करण्यात आले.
रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचे हे पाचवे वर्षे असून, सौदी अरेबियात या फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. हा पुरस्कार जिंकल्याबद्दल आलियाने आनंद व्यक्त करताना, गोल्डन ग्लोब्सने सन्मानित होणे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे असे म्हटले आहे. जगभरातील चित्रपट आणि टेलिव्हिजनमध्ये परिवर्तन घडवून आणणाऱ्या नवीन पिढीतील इच्छुक कलाकार आणि महिलांच्या वतीने बोलण्याची संधी मिळाल्याबद्दल मी कृतज्ञ आहे, अशा शब्दांत आलियाने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
या प्रसंगी गोल्डन ग्लोब्सच्या अध्यक्षा हेलेन होहन म्हणाल्या की, आलिया भटला गोल्डन ग्लोब्स होरायझन पुरस्काराने सन्मानित करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. चित्रपटसृष्टीतील तिच्या योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे. आलियाच्या कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, आलिया भट लवकरच यशराज फिल्म्सच्या आगामी स्पाय युनिव्हर्स चित्रपट ‘अल्फा’ मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात शर्वरी वाघ आणि बॉबी देओल या कलाकारांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. आलिया शेवटची ‘जिग्रा’ चित्रपटात दिसली होती.
हेही वाचा : गोलमाल 5 ची स्टारकास्ट ठरली! ‘या’ दोन प्रसिद्ध अभिनेत्रींची नव्या भागात एन्ट्री





