Golmaal 5 : प्रसिद्ध बॉलीवूड निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या अॅक्शन चित्रपटांसह कॅामेडी चित्रपटांची देखील प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. गोलमाल या कॅामेडी चित्रपटाने रोहित शेट्टीला एक वेगळी ओळख मिळवून दिली. त्याने अनेक यशस्वी चित्रपट केले आहेत. सध्या गोलमाल ५ चित्रपटाच्या तयारीत रोहित व्यस्त आहे. सिंघम अगेननंतर प्रेक्षक या कॉमेडी फ्रँचायझीची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता या चित्रपटातील कास्टिंगबाबत माहिती समोर आली आहे. या चित्रपटात बॅालीवूडमधील दोन प्रसिद्ध अभिनेत्रींना कास्ट करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अभिनेत्री करीना कपूर खान आणि सारा अली खान या दोन अभिनेत्रींची नावं अंतिम करण्यात आली आहेत. मात्र, अद्यापर्यंत याबाबत अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. याशिवाय अभिनेता कुणाल खेमू याला देखील चित्रपटात कास्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आता नव्या भागात आणखी कोणत्या कलाकारांचा समावेश होणार हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे. रिपोर्टनुसार, या चित्रपटाच्या कास्टिंगबाबत बरीच चर्चा झाल्यानंतर रोहित शेट्टीने करीना कपूर खान आणि सारा अली खानशी संपर्क साधला आहे. दोन्ही अभिनेत्री या चित्रपटाचा भाग होणार असल्याचे सांगितले जात आहे. रोहित शेट्टी तरुण लेखकांसोबत या चित्रपटाच्या पटकथेवर काम करत आहे. चित्रपटात अजय देवगणच्या विरुद्ध करीना कपूरला कास्ट करण्याची योजना आखली आहे. त्यामुळे करीना आणि सारा अली खान या अभिनेत्रींना सोबत स्क्रीन शेअर करताना पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. चित्रपटाचे चित्रीकरण पुढील वर्षी सुरू होण्याची अपेक्षा आहे. हेही वाचा : ई-सिगारेटवरून संसदेत गोंधळ! अनुराग ठाकूर यांचे तृणमूल काँग्रेसच्या खासदारावर आरोप ; सभागृहात गोंधळ