Sharvari Wagh And Aliya Bhatt | बॉलिवूड अभिनेत्री शर्वरी वाघचा ‘मुंज्या’ चित्रपट सुपरहिट ठरला. यानंतर शर्वरी ‘महाराज’ चित्रपटही झळकली. नुकताच तिचा ‘वेदा’ सिनेमाही रिलीज झाला. यातील तिच्या अभिनयाचे अनेकांकडून कौतुक करण्यात आले आहे. सलग मिळालेल्या चित्रपटाच्या यशानंतर शर्वरी आता यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्स मधील ‘अल्फा’ सिनेमात दिसणार आहे. विशेष म्हणजे यात शर्वरी आलिया भटसोबत झळकणार आहे. लवकरच आलिया आणि शर्वरी काश्मीरला शूटसाठी जाणार आहेत. अल्फा चित्रपटाच्या शूटिंगसाठी काश्मीरला जाण्याची खूप उत्सुक असल्याचं शर्वरी वाघने सांगितलं आहे. २६ ऑगस्टपासून ‘अल्फा’चं पुढील शेड्युल सुरु होत आहे. अल्फामध्ये आलिया आणि शर्वरी या दोन अभिनेत्रींची पॉवर, अॅक्शन सीन्स पाहायला मिळणार आहेत. सिनेमाचं पहिलं शेड्युल मुंबईत काही दिवसांपूर्वीच पूर्ण झालं. आता पुढच्या शेड्युलसाठी आलिया आणि शर्वरी काश्मीरला जाणार आहेत. याबद्दल शर्वरी वाघ म्हणाली की, “मी अल्फा चित्रपटाच्या सेटवर पुन्हा जाण्यासाठी खूप उत्सुक असून याची आतुरतेने वाट बघत आहे. हे शेड्यूल खूपच रोमांचक असणार आहे. अल्फा चित्रपटाची टीम काही काळानंतर पुन्हा भेटत आहे, त्यामुळे आम्ही सर्वजण काश्मीर शेड्यूलसाठी पूर्णपणे सज्ज आहोत.” Sharvari Wagh And Aliya Bhatt | दरम्यान, शर्वरीने ‘बंटी और बबली 2’ मधून अभिनयाला सुरुवात केली. तिच्या ‘मुंज्या’ चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. त्यानंतर आलियासोबतच्या तिच्या या चित्रपटाबाबत देखील चाहते उत्सुक आहेत. हेही वाचा: ‘प्रेम हा त्याग आहे अन्…’नागा चैतन्यच्या एंगेजमेंटनंतर समंथाने पोस्ट शेअर मांडलं ‘मत’