Love and War Film | प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट मुख्यभूमिकेत दिसणार आहे. यात रणबीर कपूर आणि आलिया भट्ट नव्या अवतारात दिसणार आहेत. या बिग बजेट चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले असून सेटवरील रणबीर आणि आलियाचा लूक ऑनलाइन लीक झाला आहे. ‘लव्ह अँड वॉर’च्या सेटवरून रणबीर कपूर आणि आलिया भट्टचे लीक झालेले फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लीक झालेल्या फोटोंमध्ये रणबीर आणि आलिया रेट्रो लूकमध्ये दिसत आहेत. जिथे रणबीरला विंटेज स्टाईलच्या मिशा आहेत आणि तो पांढरा शर्ट, काळी पँट आणि काळया टायमध्ये दिसत आहे. तर आलिया व्हाइट आउटफिटमध्ये दिसत आहे. आलियाच्या विंटेज हेअरस्टाइलने लोकांचे लक्ष वेधून घेतले. त्याच वेळी, विकी कौशल देखील चित्रपटात रेट्रो लूकमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विकी कौशल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. शाहरुख खान कॅमिओ करणार याशिवाय या चित्रपटात शाहरुख खान हा कॅमिओ करणार आहे. शाहरुख खान सध्या ‘किंग’ सिनेमाच्या तयारीत व्यस्त आहे. याआधी किंग खानने रणबीरच्या ‘ए दिल है मुश्किल’ या चित्रपटात ताहिर आणि ‘ब्रह्मास्त्र’मध्ये मोहन भार्गवचा कॅमिओ केला होता. दरम्यान, संजय लीला भन्साळी यांचा ‘लव्ह अँड वॉर’ हा चित्रपट 2026 च्या ईदला रिलीज होणार आहे. संजय लीला भन्साळी आणि रणबीर कपूर हे 17वर्षानंतर पुन्हा एकत्र येत आहेत. याआधी संजय लीला भन्साळी यांनी रणबीर कपूरला ‘सावरिया’ सिनेमात संधी दिली होती. तर संजय लीला भन्साळी यांनी आलियाला ‘गंगूबाई काठियावाडी’ मध्ये मुख्य भूमिका दिली होती. हेही वाचा : Sanjay Raut : ठाकरे गट मविआतून बाहेर पडणार? दानवेंच्या विधानावर संजय राऊतांच भाष्य, “काही जणांनी…”