Khamenei Is Back: “थरथरणाऱ्या हातात काठी, बोटात अंगठी…” ; डोनाल्ड ट्रम्प यांच्या डोळ्यात भीती दाखवणारा व्हिडीओ इराणी मीडियाकडून शेअर
Khamenei Is Back: इराण आणि अमेरिका-इस्त्रायल युद्धाने जगाची कोंडी केली आहे. इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनींनी युद्धाच्या आजच्या १४ व्या दिवशी मोठे विधान केले आहे.

Khamenei Is Back: इराण आणि अमेरिका-इस्त्रायल युद्धाने जगाची कोंडी केली आहे. इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनींनी युद्धाच्या आजच्या १४ व्या दिवशी मोठे विधान केले आहे. त्यांनी अमेरिका आणि इस्रायलला होर्मुझची सामुद्रधुनी बंदच राहणार असल्याचे पुन्हा एकदा स्पष्टपणे सांगितले आहे. तसेच शत्रूचे मनसुबे हाणून पाडण्यासाठी सर्व जनतेनं एकजूटीनं उभे राहण्यासाठी आवाहन केले आहे.
मिनाबमधील शाळेतील निष्पापांच्या बळींचा बदला घेतल्याशिवाय इराण शांत राहणार नाही असा इशाराही मोजताब खामेनींनी दिला आहे. तर मोजतबा यांनी इराणी लोकांना या वर्षीच्या कुद्स दिनाच्या मिरवणुकीत मोठ्या संख्येनं सहभागी होऊन शत्रूला इराणची ताकद दाखवण्याचे आवाहन केले आहे.
अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धात दोन्ही देशांमधील अनेक शहरांवर क्षेपणास्त्र आणि हवाई हल्ले सुरूच आहेत. आतापर्यंत इराणमध्ये किमान 1350 लोक मारले गेले आहेत आणि 17,000 हून अधिक जखमी झाले आहेत, ज्यात 1100 मुले आहेत. Khamenei Is Back
दरम्यान, इस्रायलने लेबनॉनवर आपले हल्ले तीव्र केले आहेत, ज्यामध्ये आतापर्यंत 687 लोकांचा मृत्यू झाला आहे. याचदरम्यान, इराणी मीडियाकडून एक व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला आला. या व्हिडीओमध्ये Khamenei Is Back…असे म्हटले आहे.
इराणी मीडियाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये नेमकं काय? Khamenei Is Back:
अमेरिका आणि इस्त्रायलच्या संयुक्त हवाई हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला होता. आता इराणी मीडियाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये Khamenei Is Back…असे म्हटले आहे. तसेच या व्हिडीओमध्ये खामनी चालत येत आहे. त्यांच्या थरथरणाऱ्या हातात काठी असून खामेनींचे प्रतीक म्हणून असणारी अंगठी देखील आहे.
📹 بازگشتِ خامنهای!
انیمه جدید ژاپنی از لحظه شهادت رهبر شهید و آغازِ کابوس امریکا!#انتقام_سخت pic.twitter.com/zqjPtTCsuu
— خبرگزاری تسنیم (@Tasnimnews_Fa) March 12, 2026
अमेरिकेने इराणमधील मुलींच्या शाळेवर हल्ल केला होता. या हल्ल्यात एकूण 168 जणांचा मृत्यू झाला. याबाबतही व्हिडीओमध्ये दाखवण्यात आले आहे. तसेच एकजण Khamenei Is Dead…असे डोनाल्ड ट्रम्प(Donald Trump) यांना बोलत येतो.त्यावेळी ट्रम्प आनंदी झाल्याचे दिसत आहे. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना आणखी एक फोन येतो…आणि समोरुन Khamenei Is Back…असे म्हटले जाते.
त्यावेळी इराणकडून हजारो ड्रोन हल्ले करण्यात येत असल्याचे दिसत आहे. त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांच्या डोळयात ड्रोन दाखवून त्यांच्या डोळ्यात भीती असल्याचे या व्हिडिओतून दाखवण्यात आले आहे. इराणकडून मिसाईल हल्ले कशा पद्धतीने केले जातील, याबाबत प्रतिकात्मक स्वरुपात दाखवण्यात आले आहे.
इराणचे सर्वेसर्वा अली खामेनींच्या मृत्यूनंतर रिक्त झालेल्या पदावर सर्वोच्च नेता कोण असावा यासाठी वरिष्ठांची बैठक सुरू होती. त्या बैठकीवरच इस्रायलने जोरदार क्षेपणास्त्र हल्ला चढवला. कोम शहरात सुरू असलेल्या या बैठकीत इराणचे बहुतांश वरिष्ठ नेते जमा झाले होते. त्याची खबर लागताच इस्रायलने या सभेलाच लक्ष्य केलं. Khamenei Is Back:
वरिष्ठांच्या सभेत 88 सदस्य असतात. युद्ध सुरू झाल्यावर त्यातले कितीजण शिल्लक होते याची माहिती नव्हती. मात्र सभेसाठी अनेकजण आले असल्याची माहिती होती. अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे बहुतांश वरिष्ठ नेते मारले गेलेत.





