Sonia Gandhi on PM Modi: इस्रायली-अमेरिकन हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला सय्यद अली हुसैनी खामेनी यांच्या मृत्युने देशातील राजकीय वातावरण तापले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून थेट प्रतिसाद न मिळाल्याबद्दल काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारवर तीव्र हल्ला चढवला आहे. सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारच्या मौनाचे वर्णन कर्तव्यात कसूर असल्याचे म्हटले आहे. तसेच यामुळे भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या दिशेने प्रश्न निर्माण होतात, असे म्हटले आहे. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी,”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायली-अमेरिकन हल्ल्यात अयातुल्ला सय्यद अली हुसैनी खामेनी यांच्या मृत्युवर अद्याप स्पष्ट विधान किंवा सरकारची भूमिका स्पष्ट केलेली नाही” असे म्हणत सरकारवर टीका केली. त्यांनी याला “कर्तव्यात कसूर” असे वर्णन केले त्यासोबत “हे मौन तटस्थता नसून जबाबदारी टाळणे आहे”असे म्हटले . सोनिया गांधींनी आरोप केला की अशा मौनाचा भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या विश्वासार्हतेवर परिणाम होतो. त्या म्हणाल्या की जेव्हा देश एखाद्या मोठ्या आंतरराष्ट्रीय मुद्द्यावर स्पष्ट भूमिका घेण्यात अपयशी ठरतो तेव्हा ते चुकीचा संदेश जगभरात जातो असे म्हटले. लेखात सरकारवर निशाणा साधला Sonia Gandhi on PM Modi: काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी एका इंग्रजी वर्तमानपत्रामधील एका लेखात केंद्र सरकारवर टीका केली. त्यांनी म्हटले आहे की खमेनींच्या लक्ष्यित हत्येवर भारत सरकारचे मौन हे तटस्थ भूमिका नाही तर ती जबाबदारी सोडून देण्यासारखे आहे. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पुन्हा सुरू झाल्यावर या विषयावर उघडपणे आणि बचाव न करता चर्चा करावी अशी मागणी त्यांनी केली. त्यांनी म्हटले आहे की आंतरराष्ट्रीय व्यवस्था कमकुवत होत आहे आणि अशा वेळी भारताच्या “त्रासदायक मौनावर” प्रश्नचिन्ह उपस्थित केले पाहिजे. “आंतरराष्ट्रीय संबंधांमधील एक खोल जखम” सोनिया गांधी यांनी त्यांच्या लेखात लिहिले आहे की १ मार्च रोजी इराणने पुष्टी केली की त्यांचे सर्वोच्च नेते अयातुल्ला सय्यद अली होसेनी खमेनी यांची अमेरिका आणि इस्रायलने लक्ष्यित हल्ल्यात हत्या केली. Sonia Gandhi on PM Modi: त्यांनी म्हटले आहे की, वाटाघाटी दरम्यान एका विद्यमान राष्ट्रप्रमुखाची हत्या ही आजच्या आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये एक खोल जखम आहे. त्यांनी असेही म्हटले आहे की या घटनेपेक्षाही धक्कादायक गोष्ट म्हणजे भारत सरकारचे मौन. पंतप्रधानांच्या विधानांवरही प्रश्न उपस्थित सोनिया गांधी यांनी पंतप्रधान मोदींच्या सुरुवातीच्या विधानांवरही टीका केली. याविषयी बोलताना त्यांनी, “पंतप्रधानांनी स्वतःला युएईवर इराणने केलेल्या प्रत्युत्तर हल्ल्याचा निषेध करण्यापुरते मर्यादित ठेवले, अमेरिका-इस्रायलच्या मोठ्या हल्ल्याकडे दुर्लक्ष केले” असे म्हटले आहे. पुढे बोलताना त्यांनी, यापूर्वी घडलेल्या घटनांच्या क्रमाची चर्चा झाली नाही,” असे त्यांनी म्हटले. पंतप्रधानांनी नंतर “खोल चिंता” आणि “संवाद आणि राजनयिकता” बद्दल सामान्य विधाने केली, जरी ही विधाने अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या मोठ्या हल्ल्यांनंतर आली. परराष्ट्र धोरणावर गंभीर प्रश्न उपस्थित Sonia Gandhi on PM Modi: सोनिया गांधी म्हणाल्या की जेव्हा भारतासारखा देश आंतरराष्ट्रीय कायद्याच्या उल्लंघनांवर स्पष्ट भूमिका घेत नाही तेव्हा ते चुकीचे संकेत पाठवते. त्यांनी लिहिले की जेव्हा आपला देश परदेशी नेत्याच्या लक्ष्यित हत्येवर सार्वभौमत्व किंवा आंतरराष्ट्रीय कायद्याचे स्पष्टपणे रक्षण करत नाही, तेव्हा ते आपल्या परराष्ट्र धोरणाच्या दिशेने आणि विश्वासार्हतेबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित करते. राहुल गांधींवरही निशाणा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही सोशल मीडियावर सोनिया गांधींचा लेख शेअर केला. त्यांनी लिहिले की, जेव्हा आपला देश सार्वभौमत्व किंवा आंतरराष्ट्रीय कायद्याचे स्पष्टपणे समर्थन करत नाही आणि परदेशी नेत्याच्या लक्ष्यित हत्येच्या बाबतीत तटस्थता सोडून देतो, तेव्हा ते भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या दिशेने आणि विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करते. अशा वेळी मौन बाळगणे म्हणजे तटस्थता नाही असे राहुल गांधी म्हणाले. त्यांनी असेही नमूद केले की सोनिया गांधींनी त्यांच्या लेखात या गंभीर जागतिक परिस्थितीवर भर दिला आहे . म्हटले आहे की भारताने सार्वभौमत्व आणि शांततेसाठी उभे राहिले पाहिजे आणि आपली नैतिक ताकद राखली पाहिजे.